महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image ताज्या घडामोडी व्हिडिओ

बदलापुर मध्ये टीआरपी रेल्वे गाडी घसरुन, एकाचा मृत्यू तर २ जखमी

प्रतिनिधी.

बदलापूर -अंबरनाथ आणि बदलापुर च्या दरम्यान डाऊन दिशेला कर्जत दिशेला रेल्वे स्लीपर पुरवण्याचं काम सुरू असताना गाडी घसरल्यामुळे झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. पहाटे साडेपाचच्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. रेल्वे रुळांवरून गाडीत घसरल्यानंतर कर्जत दिशेला जाणाऱ्या आणि बदलापूर वरून मुंबईला जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक पहाटे साडेपाच पासून पूर्णतः बंद ठेवण्यात आलेली आहे. आरपीएफ आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून घसरलेली टीआरपी गाडी बाजूला करून रेल्वे वाहतूक सुरळीत करण्यास प्राधान्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. सध्या सुरू असलेले लोकल सेवा ही अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असल्याने त्याचा नाहक मनस्ताप या नोकरदार वर्गाला सहन करावा लागला. बदलापूर ते कर्जत या स्थानिक यांच्या दरम्यानच्या प्रवाशांना मुंबई दिशेकडे जाता येत नसल्याने सर्व स्टेशनांवर प्रचंड गर्दी झाली होती.

बदलापूर स्थानकांच्या दरम्यान वाहतूक नऊ वाजेपर्यंत पूर्णपणे ठप्प होती. ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी पुढील काही तास लागू शकतात असे माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेत एक कामगार मृत्युमुखी पडला असून दोन कामगार जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कल्याणच्या रेल्वे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आरपीएफच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Translate »
×