नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
मुंबई/प्रतिनिधी. आज १४ एप्रिल महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ जयंती. संपूर्ण जगभर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या थाटात साजरी केली जाते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जाते. मोठ्या संख्येने बाबासाहेब यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे त्यांचे अनुयायी येत असतात.
आज महाविकास आघाडीचे अनिल देसाई यांनी देखील चैत्यभूमी येथे जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्याच्या जंयतीनिमित त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले व जनतेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते म्हणाले,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी येथे आलो आहे.चैत्यभूमी येथे आल्यानंतर एक प्रेरणा व ऊर्जा मिळते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान लिहिले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये जनतेला, सर्वसामान्यांना अधिकार दिले आहेत. कोणी कितीही प्रयत्न केले तरी भारतीय संविधान, लोकशाही ही मजबूत राहिल. असेही ते यावेळी म्हणाले