नेशन न्यूज मराठी टीम.
बीड / प्रतिनिधी – मराठा समाजाला आरक्षण मिळावे ह्यासाठी जालना जिल्ह्यात मनोज जरांगे पाटील उपोषणास बसले आहेत.त्यांना अनेक समाज बांधवांकडून पाठींबा मिळत आहे. पाठींबा देण्यासाठी मराठा समाज आंदोलक वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करत आपले मत जाहीररित्या प्रदर्शित करत आहेत. बीड मध्ये देखील वकील संघटनेकडून पाठिंबा दिला गेला आहे.
बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर जिल्हा वकील संघटनेकडून एक दिवसीय उपोषणास सुरुवात झाली आहे. वकील संघटनेच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी वकील संघटनेने देखील पुढाकार घेतला आहे. दरम्यान यावेळी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणांवर झालेल्या गुन्ह्याचे खटले विनामूल्य लढणार असल्याचा निर्णय देखील वकील संघटनेकडून घेण्यात आला आहे.