महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
चर्चेची बातमी पोलिस टाइम्स

मुंबईत महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडून एकाला अटक

मुंबई/प्रतिनिधी – महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडून केलेल्या अन्वेषणात मुंबई येथून अत्ताउल्हा मोहम्मद नईम चौधरी या व्यक्तीस अटक करण्यात आली असल्याची माहिती राज्यकर उपआयुक्त (जनसंपर्क) यांनी दिली आहे.

महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाकडूनकेलेल्या अन्वेषणातून असे निदर्शनास आले, श्री. अत्ताउल्हा मोहम्मद नईम चौधरी नामक व्यक्तीने में. गौरी इस्पात, मे तेज स्टील, मे गजानन एंटरप्रायझेस, या नावेमहाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायदा, 2017 अन्वये नोंदणी करून GSTIN क्रमांक प्राप्त केले आहेत. 

ही नोंदणीकृत व्यापारी संस्था प्रत्यक्ष खरेदी वा विक्रीव्यवहार न करता मोठ्या प्रमाणावर खोटी बिजके / देयके स्वीकारत व निर्गमित करत असल्याचे दिसून आले. श्री. अत्ताउल्हामोहम्मद नईम चौधरी यांनी विविध कंपन्यांकडून रु. 105 कोटी इतक्या रक्कमेची खोटी देयके व त्यायोगे, कोणत्याही मालाची प्रत्यक्ष देवाणघेवाण न होता रू. 18.91 कोटी इतक्या रक्कमेचा बोगस Input Tax Credit प्राप्त करून घेतला.

अत्ताउल्हा मोहम्मद नईमचौधरी यांचे कृत्य हे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायदा 2017 च कलम 132 (1) (b) व (C)नुसार गुन्हा असून, कलम 132(1) (i) नुसार कमीतकमी 6 महिने, जास्तीत जास्त 5 वर्ष तुरूंगवास, आणि दंड- इतक्या शिक्षेस पात्र आहे. तसेच या कायदयाच्या कलम 132 (5) नुसार अपराध दखलप्राप्त व अजामिनपात्र आहे.त्यामुळे अत्ताउल्हामोहम्मद नईम चौधरी यांना मुंबई येथून अटक करण्यात आली आहे.

अतिरिक्त मुख्य महानगरदंडाधिकारी यांच्या न्यायालयाने श्री. अत्ताउल्हा मोहम्मद नईम चौधरी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. महाराष्ट्र वस्तू वसेवाकर विभागाने करदात्यांस महाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायद्यानुसार करभरणा व इतर बाबींची पूर्तता नियमितपणे करण्याबाबत आवाहन केले आहे.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »