महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
चर्चेची बातमी ठाणे

तानसा व मोडक सागर धरण ओसंडून वाहण्याच्या मार्गावर;परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

नेशन न्यूज मराठी टीम.

ठाणे – ठाणे जिल्ह्यातील तानसा व मोडक सागर धरणाच्या परिसरात झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे ही दोन्ही धरणे लवकरच भरून वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या धरणांच्या तसेच तानसा व वैतरणा नदीच्या परिसराच्या गावातील ग्रामस्थांनी सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत बृहन्मुंबई महानगरपालिकेची तानसा व मोडक सागर ही धरणे आहेत.

तानसा व मोडक सागर धरण ओसंडून वाहण्याची पाताळी ही 128.63 मिटर व 163.14 टीएचडी इतकी आहे. आज तानसा व मोडक सागर धरणातील पाण्याची पातळी ही 125.33 मीटर व 161.33 मीटर इतकी झाली आहे. सध्या सुरू असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे ही पातळी पुढील काही दिवसात ओलांडून ही दोन्ही धरणे ओसंडून वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही धरणाखालील तसेच तानसा व वैतरणा नदीलगतच्या शहापूर, भिवंडी, वाडा, वसई व पालघर या तालुक्यातील गावांना व तेथील ग्रामस्थांनी सावध रहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. या परिसरातील शासकीय यंत्रणांना सतर्क करण्यात आले असल्याचे प्रशासनाने कळविले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×