डोंबिवली/प्रतिनिधी – नमस्कार मित्रांनो कृपया रक्तदान करा आणि माझा वाढदिवस अविस्मरणीय बनवा अशा ब्रिद वाक्याने प्रेरित करत रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सनसिटी सदस्या शिल्पीका मिश्रा यांच्या आवाहनाला सनसिटी क्लबच्या सदस्यांनी मोठा प्रतिसाद दिला. वाढदिवसाचे औचित्य म्हणून सुमारे १०३ रक्ताच्या बॅग जमा झाल्या. डोंबिवलीतील प्लाझ्मा ब्लड बँकेच्या माध्यमातून हा सामाजिक उपक्रम पार पडला. सर्वांनी या सामाजिक कार्यात सहकार्य केल्याबद्दल मनीष मिश्रा आणि आनंद दुबे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
कोरोरो काळात ऑक्सिजन आणि ब्लड आदींचे महत्व सर्वांना कळून आले आहे. रक्त दान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे आणि ते सिद्धही होत आहे. ज्याला रक्ताची आवश्यकता असते तेव्हा ते महत्व कळून येते त्यामुळेच सामाजिक बांधिलकी म्हणून अशा प्रकारचे कार्य केले पाहीजे हा विचार मनात आल्याने हे रक्तदान शिबीरचे वाढदिवसाचा दिवशी आयोजित केले. आमच्या सर्व सदस्यांनी तसेच मित्रमंडळींनी या कार्यात सहभागी होऊन आज हे कार्य पार पडत आहे असे वाढदिवसाच्या उत्सवमूर्ती शिल्पीका मिश्रा यांनी सांगितले.
या रक्तदान शिबिराला प्लाझ्मा ब्लड बँकेचे रवी निमसे, डॉ. सिद्देश, कल्पना खाटे, रंजना यादव, रंजना जाधव, समीना शेख, नैना जाधव, गुरू प्रकाश, उमेश जाधव, ज्ञानेश्वर आदींनी शिबिरात विशेष योगदान दिले. तर रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सनसिटीच्या सदस्या
निर्मल कौर, पूजा कपूर, स्नेहा दुबे, शिल्पीका मिश्रा, श्वेता मिश्रा, शेखर त्रिपाठी, कमलेश मिश्रा, मनीष मिश्रा आनंद दुबे यांनी विशेष मेहनत घेतली.