Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image कला/साहित्य लोकप्रिय बातम्या

जागतिक महिला दिनानिमित्त आदिवासी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात साकारली वारली चित्रकला

नेशन न्यूज मराठी टीम.

पालघर- आदिवासी समाजामध्ये महिलांचे स्थान आदराचे असून समाजातील विविध समस्या, दैनंदिन जिवनात होणाऱ्या व्यवहारामध्ये महिलांचा सहभाग असतो. वारली चित्र लिपिची जनक महिलाच असून आदिवासी समाजात परंपरा, संस्कृती ठिकविण्याचे मोलाचे कार्य महिलाच करत असल्याचा विश्वास जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी व्यक्त केला.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जागतिक महिला दिनानिमित्त आदिवासी महिलांनी भिंतीवर वारली चित्रकला स्विकारली. या चित्रकलेचे अनावरण जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी रिबिन कापून केले.या वारली चित्रामध्ये आदिवासी समाजातील जन्म संस्कार, विवाह संस्कार, मृत्यू संस्कार, पारंपारिक पंच व्यवस्था तसेच दैनंदिन जिवन रेखाटले असून हे बोलके चित्र समाजाला प्रेरणा देणारे असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले.वारली चित्रकार सुचिता कामडी यांच्या मार्गदर्शनाखाली राजश्री भोईर, स्वराली वरठा, तन्वी वरठा, शालीनी कासार, मनिषा धिंडे या चित्रकारांनी वारली चित्र साकारले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, जिल्हा परिषदेचे अपर मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, जिल्हा माहिती अधिकारी राहुल भालेराव, तहसीलदार स्वाती घोंगडे, आदिवासी श्रमिक महिला मंडळ, आदिवासी महिला एकता परीषदेच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X