महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image चर्चेची बातमी पर्यावरण

पर्यावरण दिनानिमित्त आगळा वेगळा उत्सव,केडीएमसी साजरा करणार निसर्गोत्सव

नेशन न्युज मराठी टिम.

कल्याण-पर्यावरण दिनानिमित कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनावतीने दोन दिवसांच्या निसर्गोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसांत केडीएमसीवतीने पर्यावरण जागृती विषयक कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिली.
यामध्ये घरातील कचऱ्यापासून खत निर्मिती करण्यासह आयुर्वेदीक झाडांची माहिती देणारे निसर्गोत्सव प्रदर्शन, केडीएमसी शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप, दैनंदिन जीवनात सायकल वापर करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान, हिरकणी महिला सायकल ग्रुपला हेल्मेट वाटप आदी उपक्रमांचा समावेश आहे.यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेला अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता सपना कोळी – देवनपल्ली, महापालिका सचिव संजय जाधव आदी अधिकारी उपस्थित होते.

माझी बाग, माझा परिसर या विषयाच्या अनुषंगाने आयोजित फोटोग्राफी स्पर्धेतील विजेत्या 3 स्पर्धकांना 5 जून रोजी सकाळी 10.00 वाजता स्मृती चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याप्रमाणे सहभागी स्पर्धकांचा देखील प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

महापालिका क्षेत्रातील दानशूर व्यक्तींकडून तसेच विविध सामाजिक संस्थाकडून प्राप्त सायकली महापालिकेच्या शाळांमधील गरजू विदयार्थ्यांना मोफत वितरीत करण्यात येणार आहेत. तसेच महापालिका परिक्षेत्रातील नागरिकांमध्ये पर्यावरण आणि शारिरिक स्वाथ्य राखण्याबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीकोनातून कल्याण आणि डोंबिवली शहरामध्ये सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे आयुक्त यांनी सांगितले.

त्याप्रमाणे महापालिकेच्या मुख्यालयातील तळ मजल्यावरील मोकळ्या जागेत कल्याण डोंबिवली निसर्गोत्सव २०२२ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन 5 जून रोजी सकाळी 10.00 वाजता महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे हस्ते करण्यात येणार आहे. हे प्रदर्शन 5 जून आणि 6 जूनला सकाळी 10.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत महापालिका परिक्षेत्रातील नागरिकांसाठी विनाशुल्क खुले राहणार आहे. यामध्ये रोपांची काळजी कशी घ्यावी, स्वयंपाक घरातील कच-यापासून खत निर्मिती, विविध आयुर्वेदिक रोपांची माहिती, लँडस्केप ट्रे, किचन गार्डनिंग आदी विषयक माहिती दिली जाईल. तसेच महापालिका परिक्षेत्रातील निवडक नर्सरीकडून रोपांची माहिती आणि स्वस्‍त दरात विक्री असे अनेकविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे आयुक्त डॉ. सुर्यवंशी यांनी सांगितले. त्याप्रमाणे 5 आणि 6 जून या दोन्ही दिवशी पर्यावरणातील तज्ञ व्यक्तींमार्फत मार्गदर्शनही केले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×