नेशन न्यूज मराठी टिम.
कल्याण/प्रतिनिधी – आत्ता तर धनुष्यबाणापेक्षा रॉकेट पण चालतात. त्यांच्याकडे धनुष्यबाण तर माझ्याकडे रॉकेट आहे. मला छेडण्याचा प्रयत्न केला तर मी नाव घेऊन सांगेन. मी कोणाच्या बापाला बाप म्हणत नाही. माझ्या निधीच्या फाईल्स कोणाच्या टेबलखाली दाबून ठेवल्या आहेत. इतकेच नाही तर सर्व सण येत आहे. पोलिसांवर ताण आहे. पोलिसांची मदत ही जनतेला मिळाली पाहिजे.
जो अपक्ष म्हणून निवडणून येतो त्याला सत्ताधाऱ्यासोबत रहावं लागतं. आणि सत्ताधाऱ्यांसोबत गेले नाही तर विकास होत नाही.मात्र शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना गुंडांना चार चार पोलिसांचा बंदोबस्त दिला जातो अशी टिका भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थित केली आहे.