नेशन न्यूज मराठी टीम.
सोलापूर / प्रतिनिधी – देशामध्ये बेरोजगारीची प्रमाण वाढत आहे. एकीकडे रेल्वे, बँका, सरकारी यंत्रणांचे खाजगीकरण करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने सोलापूर शहर युवक काँग्रेस कडून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसानिमीत्त अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटी सदस्य आमदार प्रणिती शिंदे, महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली दाजी गणपती, दत्तनगर चौकात सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांकडून चहाची केटली, पैसे मागण्याचा कटोरा, फलक घेऊन राष्ट्रीय बेरोजगार दिन साजरा करण्यात आला.
2 कोटी युवकांना दर वर्षी रोजगार, नोट बंदी ,जी.एस. टी, बँकांचे खाजगीकरण या कारणांमुळे बेरोजगारी वाढत चालली आहे. देशामध्ये धार्मिक तेढ निर्माण करणे, अग्निपथ योजनेसारखे फसव्या योजनेला युवा वर्ग कंटाळला आहे असे यावेळी युवक काँग्रेस सदस्यांकडून सांगण्यात आले.