महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
करियर लोकप्रिय बातम्या

एमपीएससीच्या वतीने विविध विषयातील तज्ज्ञ सल्लागारांना अर्ज करण्याचे आवाहन

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे शासन सेवेत पात्र उमेदवारांची निवड करण्यासंदर्भात विविध स्पर्धा परीक्षा व चाळणी परीक्षा घेण्यात येतात. सदर सर्व परीक्षा यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता अभ्यासक्रम तयार करणे, परीक्षा व मुलाखतीसंबंधी कामे करण्यासाठी आयोगास बाह्य माध्यमांची , तज्ज्ञ व्यक्तींची आवश्यकता असते. यास्तव अशा तज्ज्ञ व्यक्तींची माहिती  संकलित करण्यासाठी आयोगाने https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर ‘ADVISOR PORTAL’ विकसित केले असून सदर संगणकीय पोर्टलद्वारे आयोगासाठी वरील कामे करण्यास इच्छुक असलेल्या विविध विषयातील तज्ज्ञ व्यक्तीकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

ऑनलाईन अर्ज मागविण्यासंबंधी आयोगाने दिनांक 12 ऑगस्ट, 2022 रोजी https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केले आहे. सदर प्रसिद्धपत्रकातील सूचना व कार्यपद्धतीचे अवलोकन करावे. प्रसिद्धीपत्रकातील कार्यपद्धतीनुसार इच्छुक तज्ज्ञ व्यक्तींनी आयोगाकडे ऑनलाईन अर्ज सादर करावेत, अधिक तपशीलासाठी आयोगाचे https://mpsc.gov.in संकेतस्थळास भेट द्यावी असे राज्य लोकसेवा आयोगाचे परीक्षा नियंत्रक व सहसचिव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×