महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
लोकप्रिय बातम्या शिक्षण

१२ एप्रिला विद्यार्थी संघटना संयुक्त समितीचे आझाद मैदानात धरणे आंदोलन

नेशन न्यूज मराठी टीम.

मुंबई/संघर्ष गांगुर्डे – बार्टीच्या ८६१ संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळालीच पाहिजे
संशोधनासाठी सन २०२१ मध्ये प्रवेश घेतलेले अनुसुचित जातीतील संशोधक विद्यार्थी यांना फेलोशिप पासुन वंचित ठेवून संशोधनाची – शिक्षणाची संधी शासन, प्रशासन त्यांच्याकडून हिरावून घेत आहे.बार्टीकडे अर्ज केलेले व सर्व पात्रता अटी पूर्त केलेले फेलोशिप साठी पात्र असलेले संशोधक विद्यार्थी दिनांक २० फेब्रुवारी, २०२३. पासुन आझाद मैदान येथे त्यांच्या न्यायिक व हक्काच्या फेलोशिपच्या मागणीसाठी धरणे आंदोलन करीत असून १२ एप्रिल, २०२३. पर्यंत ५१ दिवस होतील; परंतु आजपर्यंत शासनाने विद्यार्थ्यांच्या न्यायिक मागण्यांची गंभीर दखल घेतलेली नाही.

आझाद मैदान येथे धरणे आंदोलनास बसलेल्या संशोधक विद्यार्थ्यांची मागणी न्यायिक असून, महाराष्ट्र भरातील सर्व विद्यार्थी संघटना एकत्र येवून “विद्यार्थी संघटना संयुक्त समीती” यांच्या वतीने दिनांक १२/४/२०२३ रोजी सकाळी १०.३० वा. आझाद मैदान येथे विविध मागण्यासाठी भव्य धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

बार्टी मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृती (BANRF- 2021) अंतर्गत सर्व ८६१ संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट अधिछात्रवृती (फेलोशिप) मंजूर करण्यात यावी.
UGC च्या fellowship Guidelines नुसार बार्टी मार्फत BANRF 2019-20 च्या संशोधक विद्यार्थ्यांना m.phil To PHD. साठी नियमित पाच वर्षे अधिछात्रवृती देण्यात यावी.
UGC च्या fellowship Guidelines नुसार बार्टी मार्फत BANRF -2018 च्या PHD संशोधक विद्यार्थ्यांना पाच वर्षे अधिछात्रवृती देण्यात यावी. या प्रमुख मागण्या धरणे आंदोलनात आसतील.अशी माहिती विद्यार्थी संघटना संयुक्त समितीच्यावतीने देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×