महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
राजकीय

डोंबिवलीत १३ मे रोजी मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तोफ कडाडणार

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

डोंबिवली/प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या शेवटचा टप्पा हा फारच रंगत होणार आहे. कारण शिवसेनेचा बाल्लेकिल्ला असलेला कल्याण लोकसभा मतदारसंघ यातील लढत फार अटीतटीची होणार असे दिसत आहे. शिवसेनेच्या फुटीनंतर येथे शिवसेनेच्या दोन्ही गटाचा सामना या मतदार संघात बघायला मिळणार आहे. यात दोन्ही गटाकडून म.ठ्या ताकदीने प्रचार सुरू आहे. या लोकसभेचे महत्व एवढे आहे की महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची कल्याणा १५ मे रोजी सभा आहे. त्या आधी म्हणजे १३ मे रोजी माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची तोफ डोंबिवली येथे कडाडणार आहे.

कल्याण पूर्वेत ठाकरे गटाकडून भव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती .या रॅलीत कल्याण लोकसभेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासह ठाकरे गटाचे , काँग्रेस व आम आदमी पार्टीचे पदाधिकारी सहभागी झाले होते. महाविकास आघाडीला उत्तम प्रतिसाद जनतेकडून आहे.13 मे रोजी उद्धव ठाकरे यांची डोंबिवली येथील भाग शाळा मैदानावर जाहिर सभा होणार आहे. या सभेची माहिती देताना कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांनी सांगितले की, डोंबिवलीत उद्धव ठाकरे यांचे घणाघाती भाषण होणार आहे. नेहमीच्या भाषणापेक्षा वेगळे भाषण करतील कल्याण लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांच्या विरुद्ध वैशाली दरेकर अशी लढत आहे आता 13 मे रोजी उद्धव ठाकरे काय बोलणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Posts
Translate »
×