नेशन न्यूज मराठी टीम.
नाशिक/प्रतिनिधी – नाशिक येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये ठाण्याच्या ओम कदम आणि अस्मित झा ने पहिल्या दिवशीच सुवर्णपदक पटकावत स्पर्धेत ठाण्याला आघाडी मिळवून दिली. तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ वि सब ज्युनिअर क्योरुगी व ४ थी राज्यस्तरीय कॅडेट क्योरोगी तायक्वांदो स्पर्धेला आज दमदार सुरुवात झाली.
स्पर्धेच्या उद्घाटनासाठी तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष अनिल झोडगे, महासचिव संदीप ओंबासे, फुट्सल संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील पूर्णपात्रे, फुटसलचे सचिव विठ्ठल शिरगावकर, स्पर्धेचे आयोजन समितीचे प्रमुख प्रसाद कुलकर्णी, गॅफार पठाण व तुषार आवटी हे उपस्थित होते. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेमध्ये राज्यातील 900 खेळाडूंनी सहभाग घेऊन स्पर्धेला उदंड प्रतिसाद दिला असून या स्पर्धेतील विजेते खेळाडू महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.