Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image राजकीय

नागपुरात वंचितची पदाधिकारी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

नेशन न्यूज मराठी टीम.

नागपूर/प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष एड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितित व प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या मार्गदर्शनात पक्षाच्या नागपूर महानगर व जिल्हा ग्रामीण च्या सर्व पदाधिकाऱ्यांची दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा दिनांक 19 मे व 20 मे २०२३ रोजी महात्मा फुले सांस्कृतिक सभागृह येथे संपन्न झाली.

संपूर्ण राज्यात निर्माण झालेली राजकीय अनिश्चितता व त्यातून कोणत्याही क्षणी होणार असलेल्या निवडणूकांच्या पार्श्वभुमिवर पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हे प्रशिक्षित असावे करिता सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यशाळा चे उद्घाटन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष एड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले. तथा प्रमुख प्रशिक्षक म्हणून प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी मार्गदर्शन केले. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, डॉ निशा शेंडे, राजेंद्र पतोडे, जितरत्न पटाईत, भास्कर भोजने, डॉ अनिकेत मून इ. यांनी निवडणूक व्यवस्थापन तथा इतर विषयांवर मार्गदर्शन केले. प्रसंगी राज्य कार्यकारिणी सदस्य तथा जिल्हा प्रभारी कुशलभाऊ मेश्राम, माजी राज्यमत्री डॉ. रमेशकुमार गजबे, युवा आघाडी चे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा, इ. प्रामुख्याने उपस्थित होते. सोबतच जिल्हा व महानगर चे पदाधिकारी उपस्थित होते.

नागपूर महानगर अध्यक्ष रवीभाऊ शेंडे यांनी सर्वांचे स्वागत केले. जिल्हाध्यक्ष विलास वाटकर यांनी प्रस्ताविक, जिल्हा महासचिव अजय सहारे यांनी संचालन तथा सिध्दांत पाटील यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X