नेशन न्यूज मराठी टीम.
नागपूर / प्रतिनिधी – जालना घटनेबाबत सर्वत्र प्रतिक्रिया उमटत आहे. मराठा आरक्षण बाबत सरकारची भूमिका पाहता पटोले म्हणाले, भाजपने त्या काळात चूक केली आहे, सत्तेसाठी काहीपण ही भाजपची भूमिका आता त्यांच्या अंगलट येत आहे. बंजारा समाजाला ,मराठ्यांना आश्वासन देऊन हे सरकार सत्तेत आले. मोर्चे निघाले पण न्याय देऊ शकले नाही. महाराष्ट्राला सुद्धा मणिपूर करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. मराठा समाजाची 16 टक्के आरक्षण मागणी होती, ओबीसी मराठा आता भांडण लावण्याचं काम होत आहे. ओबीसी आग आहे, यात सरकारने पडू नये. जातीनिहाय जनगणना हा यावर उपाय आहे, भाजप त्याला विरोध करत आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ,मराठ्यांना आश्वासन दिलं, देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन केले ते राजकीय होते का? त्या मताच्या विश्वासावर निवडून आले.सरकारने स्वतःच्या चुकीमुळे ओबीसी मराठ्यात भांडण लावू नका. जातिनिहाय जनगणना करा, 50 टक्के आरक्षण सीमा काढून टाका. मात्र, सरकार गैरसमज पसरवत आहे, त्यात महागाई बेरोजगारी हा विषय अधिवेशनात घ्या, अस पत्र सोनिया गांधी यांनी दिलं, पण त्यावर बोलत नाही.
संघ प्रमुख मोहन भागवत यांच्या अखंड भारत बाबत बोलताना पटोले म्हणाले, सत्तेतील सरकार आरएसएस विचाराची सरकार आहे. सध्याच्या भारतात मणिपूर पेटत आहे, काश्मीर मध्ये निवडणुका होत नाही आहे, मग अखंड भारत कोणता पाहिजे हे स्पष्ट करा. आता भारत कुठं आहे, मणिपूर मध्ये महिलांवर अत्याचार होत आहे, त्यावर का बोलत नाही.
काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे, रायपूरला ठराव करुन घेतला , यात जातीनिहाय जनगणना करू, सेन्सेस झालं पाहिजे, हे स्पष्ट आहे. .गडचिरोली जिल्ह्यात दोन टक्के आरक्षण राहिले आहे, सर्वच समाजाची संख्या वाढली आहे, तिथे आजही लोक मुख्य प्रवाहात आले नाही, 50 टक्के सिलिंग तुटले पाहिजे, सरकार अधिवेशन बोलवत आणि अजेंडा पुढे येत नाही, मणिपूर पेटल आहे.
जरंडेश्वर कारखाना प्रकरणातील अजित पवार सत्तेत गेल्यावर सगळे आरोप धुवून निघाले. स्टार्ट अप इंडियाच काय झालं, शहराची नाव बदलवले जात आहे, आता इंडिया चे नाव बदलत आहे, सरकारला जनता बाहेर फेकल्याशिवाय रहाणार नाही. लोकशाहीत जनता शक्तिशाली आहे.
निवडणूक आयोगाला उद्देशून पटोले म्हणाले, त्यांना कुठला अधिकार आहे, हे माहीत नाही. निवडणुका घेणे सरकारच्या हातात असते, आम्ही तयार आहोत. प्रणिती शिंदे ह्यांच्या वक्तव्याबाबत म्हणाले, बदला हा विषय नसतो, अशी भाषा त्या बोलणार नाही. आगामी निवडणुकीत आम्ही 80 टक्के युवांना लोकसभेत तिकीट देऊन, कोणाला द्यायचे स्पष्ट ठरले नाही, येत्या काळात स्पष्ट होईल.
दहीहंडीत मोठ्या प्रमाणावर राजकारणी पैसा खर्च करतात. हा उत्सव उत्सव न राहता वेगळे वळण घेवू लागला आहे. अश्या राजकीय दहीहंडी बाबत बोलताना पटोले म्हणाले कि, श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करतो. यात आशीर्वाद असतो. मुंबई, ठाणे, मीरा भाईंदर, या पट्ट्यात दहीहंडी साजरी होते. दहीहंडी सत्तेत बसलेले लोकांचा उत्सव आहे, त्याचे बक्षीस मोठे आहे. याकडे चौकशी केली पाहिजे.