महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
राजकीय

ओबीसी बहुजन पार्टी लोकसभेच्या २२ जागा लढविणार – प्रकाश शेंडगे

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

सांगली/प्रतिनिधी -देशभरात सर्व राजकीय पक्षांची लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे. त्यातच ओबीसी बहुजन पार्टीचे नेते यांनीही निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश शेडगे म्हणाले की सांगली लोकसभा निवडणूक लढवायची की नाही याबाबत कार्यकर्त्यांचा जनाधार घेतला. यावेळी कार्यकर्त्यांनी सांगलीतून निवडणूक लढवावी असं आग्रह धरला. त्यामुळे सांगलीतून आता लोकसभा निवडणूक लढविणार आहे. तसेच राज्यामध्ये 22 ठिकाणी ओबीसी बहुजन पार्टी निवडणूक लढविणार असल्याचेही यावेळी प्रकाश शेंडगे यांनी जाहीर केले आहे.

भाजपला आता पराभव समोर दिसू लागला आहे. मोदी लाट आता शिल्लक राहिलेली नाही. मंदिराचा इम्पॅक्ट सांगली जिल्ह्यात होणार नाही. शिवसेनेने चळवळीचा उमेदवार दिला असता तर एक वेळ ठीक होते परंतु कच्चा उमेदवार दिलाय. सांगलीत काँग्रेस पक्षाची तिकिटासाठी धडपड सुरू आहे. तिकिटासाठी काँग्रेस नेत्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत वणवण करावी लागतेय. काँग्रेस पक्षाची एवढी वाईट अवस्था यापूर्वी सांगलीत कधी झाली नव्हती.असेही ते म्हणाले.

वसंतदादांचा सांगली हा बालेकिल्ला आहे. काँग्रेससाठी आम्ही देखील यापूर्वी दोन पाऊल मागे गेलो आहोत. त्यामुळे आता सांगलीत काँग्रेसला उमेदवार मिळत नसेल तर त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा. काँग्रेसने आम्हाला पाठिंबा दिल्यास काँग्रेस कार्यकर्त्यांना जिवंत ठेवण्याचे काम आम्ही करू अन्यथा या जिल्ह्यातून काँग्रेस संपून जाईल. प्रकाश आंबेडकर यांनी आम्हाला सांगलीत पाठिंबा दिलाय. त्यामुळे त्यांना आम्ही अकोल्यामध्ये पाठिंबा दिलाय. कोल्हापूर मधून छत्रपती शाहू महाराज निवडून यावेत, अशी आमची भावना आहे. त्यामुळे आम्ही कोल्हापूरमध्ये त्यांना पाठिंबा दिला असल्याचेही प्रकाश शेंडगे यांनी सांगितले.

Translate »
×