नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
मुंबई/प्रतिनिधी – राज्यातील महानिर्मिती महावितरण आणि महापारेषण या वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांचा विविध मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप दि 5 मार्च पासून महाराष्ट्र राज्य भर चालू आहे या संपा मधे 95% पेक्षा जास्त कंत्राटी कामगार सहभागी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कृती समिती च्या पदाधिकारी यांनी सहाद्री अतिथीगृहात ऊर्जा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट व चर्चा करून कंत्राटी कामगारांना न्याय द्यावा अशी आग्रही मागणी केली या बाबतीत शासन स्तरावर 2 दिवसात बैठक आयोजित करून कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन देवेंद्रजी फडणवीस यांनी कृती समिती च्या पदाधिकारी यांना आज दिले. या कृती समिती चे पदाधिकारी नीलेश खरात, नचिकेत मोरे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
महानिर्मीती च्या व्यवस्थापकीय संचालक अनबलगन यांनी दि 6 मार्च रोजी कृती समिती पदाधिकारी समावेत सकारात्मक चर्चा करून कंत्राटी कामगारांची समस्या जाणून घेवून कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगितले आहे पण कोणत्याही ठोस आश्वासन दिले नाही. त्यामुळे प्रशासन जर या मागण्यांकडे कानाडोळा करत असेल तर हे कंत्राटी कामगारांसाठी बेमुदत आंदोलन पुढे सुरू राहणार आहे असा इशारा कृती समितीने दिला आहे.
1) राज्यातील तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांच्या कंत्राटदाराकडून होणारी आर्थिक पिळवणूक दूर करण्यासाठी कंत्राटदार विरहित रोजगार द्यावा 2) कामगारांच्या वेतनात जीवन वेतन द्यावे 3) रोजंदारी कामगार पद्धती द्वारे शाश्वत रोजगार द्यावा. या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती तर्फे राज्यातील सुमारे 42 हजार वीज कंत्राटी कामगारांचा दि 5 मार्च रात्री बारा वाजल्यापासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.
या बाबतीत गेल्या 15/20 वर्षांपासून न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या कामगारांना शासनाने सकारात्मक चर्चा करून पुर्तता करावी अशी मागणी कृती समिती संघटक सचिन मेंगाळे यांनी व्यक्त केली आहे. महानिर्मीती च्या व्यवस्थापकीय संचालक यांनी पुढाकार घेतला तसेच पुढाकार महापारेपण कंपनी व महावितरण कंपनी प्रशासन घेवून कंत्राटी कामगारांना न्याय द्यावा अशी मागणी कृती समिती निमंत्रक रोशन गोस्वामी यांनी व्यक्त केली
.