नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेस दहशतवादी मुक्त झाली आहे,जे जायला घाबरत होते आता हिम्मत करतायत, तेही आमचेच आहेत,तेही सगळे येतील त्यांना उशिरा का होईना पण शहाणपण सुचल्याशिवाय राहणार नाही असा टोला प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी जितेंद्र आव्हाड यांना नाव न घेता लगावला..
शहरातील विविध विकास कामाबद्दल चर्चा करण्यासाठी आज राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.. यावेळी पत्रकारांनी अजित पवार यांनी जितेंद्र आवड यांना तर आरोप केले होते जितेंद्र आव्हाड यांचा त्रास होता का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी कुणामुळे कोण सोडून गेलं याच्यापेक्षा आमच्यामुळे कोण जोडले जात असेल तर तो जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे.. कोणाच्या खांद्यावर कोणाचं ओझं टाकण्यापेक्षा आम्ही आता सक्षम आहोत, आम्हाला कोणाच्या सल्ल्याची गरज नाही जे आमच्या सोबत येतील त्यांना आमच्या सोबत पुढे नेण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. दहशतवादी मुक्त राष्ट्रवादी काँग्रेस झाली आहे हे सगळेच कार्यकर्ते बोलतायत,लोक त्या ठिकाणी जायला घाबरत होते आता लोकं हिंमत करतायत, तेही सगळे येतील त्यांना उशिरा का होईना पण शहाणपण सुचल्याशिवाय राहणार नाही असा टोला नाव न घेता जितेंद्र आव्हाड यांना लगावला. या पत्रकार परिषदेत हिंदुराव यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील चारही नगरसेवक अजित पवार यांच्यासोबत आहेत येत्या काळात अजित पवार यांच्या माध्यमातून शहरांचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं सांगितलं.