नेशन न्यूज मराठी टिम.
संभाजीनगर/प्रतिनिधी – निवडणुका आल्या की सर्वच जागांवर दावा सांगावा लागतो, त्यावेळी चर्चेत आपली मागणी मागता येते आणि हे प्रत्येक पक्ष करतो त्यात नवीन नाही. प्रकाश आंबेडकर हे मोठं व्यक्तिमत्व आहे. मात्र त्यांच्या पक्षाने घेतलेल्या निर्णयाचा फायदा भाजपला होतो. त्यामुळे आता सर्वांनी एकत्र येऊन भाजपाविरोधात लढण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी शरद पवार गट आ. रोहित पवार यांनी व्यक्त केले.
भाजपने ऑफर दिल्याने शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटी होत असल्याची माहिती समोर आली, त्यावर आ रोहित पवार यांनी प्रतिउत्तर दिले. एखादी बातमी आली म्हणून ती खरी होत नाही आणि राहिला प्रश्न बातमीतल्या आशयाचा तर पवार साहेबांना लोकांनी ऑफर दिली तरीसुद्धा पवार साहेब लोकांमध्येच राहत आहे. पवारसाहेबांनी महाराष्ट्र धर्म स्वीकारला, संघर्ष स्वीकारला. भाजपच्या विचारासोबत ते जात नाहीये आणि त्यामुळे ते लोकांसाठी काम करणार हे स्पष्ट होतं असं रोहित पवार म्हणाले.
शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीबाबत विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेस आ. विजय वडेट्टीवार यांनी शंका व्यक्त केली त्यावर, ते जे म्हणाले त्याच्याशी मी सहमत नाही ते त्या गुप्त बैठकीत नव्हते, त्यामुळे त्यांनी असं बोलण्याची गरज नाही असे रोहित पवार म्हणाले. मागील अनेक वर्षांपासून विरोधात असलेले पक्ष एकत्र आले. सर्वांना माहिती आहे की, सोबत राहिल्याशिवाय पर्याय नाही. काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येताय मात्र तसं नाही, शरद पवार महाविकास आघाडीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांशी संपर्कात आहे आणि राहिला प्रश्न त्यांच्या भूमिकेचा तर सभेला फक्त एक दिवस राहिलाय. सभेत ते भूमिका स्पष्ट करतील आणि सगळ्यांना कळेल असे रोहित पवार म्हणाले. पवार साहेबांना माहीत आहे लोक त्यांच्यासोबत आहेत, त्यामुळं ते न घाबरता पुढं जातात, काही लोक घाबरत असेल या सगळ्याचा तर स्वाभाविक आहे. जे सत्तेत आहेत रोज बसले तरी लोकांचे प्रश्न सुटणार नाहीत, त्यासाठी लोकांमध्ये जावे लागेल, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.