महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
ठाणे ताज्या घडामोडी

आता केडीएमसीचा दर सोमवारी जनता दरबार

नेशन न्यूज मराठी टीम.

कल्याण/संघर्ष गांगुर्डे – नागरिकांच्या तक्रारी, निवेदने यांच्या निपटारा विशिष्ट कालावधीत व जलदगतीने होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे महापालिकेच्या कार्यलयीन कामकाजात गतिमानता व पारदर्शकता आणण्यासाठी तसेच जनतेच्या तक्रारी समजून घेणे, त्यांच्या अडीअडचणी दूर करुन घेणे, नागरिकांना विविध कल्याणकारी योजनांची माहिती स्थानिक स्तरावर देणे आवश्यक आहे.  त

याकरिता नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याकरिता आठवडयाच्या प्रत्येक सोमवारी दु. 3 ते 5  या कालावधीत परिमंडळ 1 व 2 च्या उपायुक्तांनी त्यांच्या अधिपत्याखालील मध्यवर्ती प्रभागक्षेत्र कार्यालयात “जनता दरबार” आयोजित करण्याबाबत कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी निर्णय घेतला आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी सदर जनता दरबार कल्याण मध्ये ब प्रभाग क्षेत्र कार्यालयात आणि डोंबिवली मध्ये , डोंबिवली रेल्वे स्थानकानजीकच्या महानगरपालिकेच्या जुन्या विभागीय कार्यालयात उद्या दुपारी 3.00 ते 5.00 या वेळेत संपन्न होणार आहे.

या जनता दरबारात कर्मचारी सेवा विषयक बाबी तसेच नागरिकांच्या सर्व तक्रारी घेणे बंधनकारक राहील. संबंधित परिमंडळातील सर्व संबंधित सहा.आयुक्त व इतर तांत्रिक अधिकारी व कर्मचारी यांनी देखील या वेळी हजर राहणे बंधनकारक राहील. संबंधित विभागीय उपआयुक्त यांच्याकडे तक्रारी/समस्या प्राप्त झाल्यावर त्यापुढील 15 दिवसात त्याचे निराकरण करुन नागरिक/कर्मचारी यांना उत्तर द्यावे असे निर्देश आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी एका परिपत्रकान्वये निर्गमित  केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×