मुंबई/प्रतिनिधी – राज्यात म्युकरमायकोसीसच्या रुग्णांची संख्या वाढत असून या आजारावरील उपचारासाठी आवश्यक असलेले ॲम्फोटेरेसीन बी इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने जागतिक निविदा काढली आहे. त्या माध्यमातून साधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यात या इंजेक्शनच्या 60 हजार व्हायल्स आंतरराष्ट्रीय स्तरावरून थेट महाराष्ट्रात दाखल होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. ग्रामीण भागात आशा स्वयंसेविकांना कोरोना चाचणीचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे श्री. टोपे यांनी संगितले.
मंत्रालयात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आणि म्युकरमायकोसीस आजाराबाबतच्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर माध्यमांना माहिती देतांना आरोग्यमंत्री श्री. टोपे बोलत होते.
यासंदर्भात अधिक माहिती देताना आरोग्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रात सध्या म्युकरमायकोसीसचे 2245 रुग्ण आहेत. या आजारावर उपचारासाठी ॲम्फोटेरीसीन-बी इंजेक्शन वापरले जात असून त्याची किंमत जास्त आहे. केंद्र शासनाकडून या इंजेक्शन वाटपाचे नियंत्रण केले जात आहे. मात्र महाराष्ट्रात हे इंजेक्शन मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हावे यासाठी राज्य शासनाने जागतिक निविदा काढली असून त्यामाध्यमातून जूनच्या पहिल्या आठवड्यात 60 हजार व्हायल्स उपलब्ध होतील.
ॲम्फोटेरेसीन बी इंजेक्शनचा पुरवठा केंद्र शासनाकडून होत असून रुग्णसंख्येनुसार जिल्ह्यांना त्याचे वाटप केले जात आहे. त्यामुळे या आजाराच्या रुग्णांची अद्ययावत माहिती आयडीएसपी या पोर्टलवर दिली जाईल याची दक्षता जिल्हाधिकाऱ्यांनी घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
म्युकरमायकोसीस या आजाराला महाराष्ट्र शासनाने नोटीफाईबल डिसीस म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णाची नोंद घेतली जाणार आहे. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत म्युकरमायकोसीच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला असून त्यासाठी राज्यभरात 131 रुग्णालये नोटफाईड करण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचा समावेश आहे. सध्या राज्यात सुमारे 2200 रुग्णांपैकी 1007 रुग्णांवर महात्मा फुले आरोग्य योजनेतून उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी नसलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसीसचे काही रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना रुग्णांसाठीच्या उपचारासाठी जे दर निश्चित करण्यात आले आहेत ते म्युकरमायकोसीसच्या रुग्णांना लागू करून त्यानुसार उपचार व्हावेत यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे श्री. टोपे यांनी सांगितले.
ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका आरोग्य विभागाचा कणा म्हणून ओळखल्या जातात. ग्रामीण भागातील कोरोनाची साथ रोखतानाच आता आशा स्वयंसेविकांना रॅपीड ॲण्टीजेन चाचणी आणि स्वयंनिदान चाचणी करण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात सुमारे 70 हजाराच्या आसपास आशा स्वयंसेविका आहेत.
राज्याच्या सरासरी एवढ्या पॉझीटिव्हीटी दरापेक्षा १८ जिल्ह्यांतील पॉझीटिव्हीटी दर जास्त आहे तेथे होम आयसोलेशन (गृह अलगीकरण) ऐवजी कोविड केअर सेंटरमध्ये अलगीकरणावर भर द्यावा. ग्रामीण भागातील संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कोरोना बाधितांच्या संस्थात्मक विलगीकरणावर भर द्यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. १५ वित्त आयोगातून उपलब्ध निधीतून ग्रामपंचायतींनी २५ टक्के निधी हा कोरोना केअर सेंटर उभारणीसाठी वापरण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी या बैठकीत दिल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.
Related Posts
-
कामगार राज्य विमा महामंडळ, राष्ट्रीय प्रशिक्षण अकादमीचे विविध विषयांवर प्रशिक्षण शिबीर
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी - कामगार राज्य विमा महामंडळ,…
-
तान्हाजी – द अनसंग वॉरिअर आता करमुक्त
मुंबईः प्रतिनिधी तानाजी मालुसरे आणि कोंढाणा किल्ल्याचे तत्कालीन सुभेदार उदयभान…
-
कल्याण डोंबिवली मध्ये कोरोना बाधितांसाठी वॉररूम सज्ज
प्रतिनिधी . कल्याण - कोव्हीड १९ च्या नियंत्रणासाठी केंद्रीभूत नियोजनाच्या दृष्टीने…
-
आता होमगार्ड्सना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नैसर्गिक आपत्ती व दुर्घटनांवेळी मदतकार्यासाठी…
-
विधिमंडळ कामकाजाची माहिती आता एका क्लिकवर
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर /प्रतिनिधी - विधिमंडळ कामकाजाची दैनंदिन…
-
ग्रामपंचायतींसाठी १३ ऐवजी आता १६ ऑक्टोबरला मतदान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - विविध 18 जिल्ह्यांतील 82…
-
भेंडी दिन व भेंडी लागवड प्रशिक्षण संपन्न
कल्याण प्रतिनिधी - कल्याण तालुक्यामध्ये मौजे पोई येथे तालुका कृषी अधिकारी कल्याण यांचे मार्फत भेंडी दिन व शेतकरी प्रशिक्षणनुकतेच…
-
१ जुलैपासून आशा स्वयंसेविकांना १५०० रुपयांची वाढ
मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील ‘आशा’ स्वयंसेविकांना १ जुलै २०२१ पासून एक हजार…
-
आता केडीएमसीचा दर सोमवारी जनता दरबार
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - नागरिकांच्या तक्रारी, निवेदने यांच्या निपटारा…
-
सरकार विरोधात आशा गटप्रवर्तक संघटनेचे जोडे मारो आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - शेवगाव तालुक्यातील आशा…
-
आता शेतकरी, शेतमजुरांनाही वनामती आणि रामेती संस्थांमधून प्रशिक्षण मिळणार
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई – राज्यातील कृषि आणि कृषि संलग्न…
-
कोरोना योद्धाची काळजी घेऊया कोरोनाला हरवूया
प्रतिनिधी . कल्याण - जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे.दिवसन…
-
मिशन गगनयान कर्मचाऱ्यांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - भारतीय नौदलाच्या कोची…
-
राज्यभर कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आता मी जबाबदार मोहीम
मुंबई प्रतिनिधी- मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा असे…
-
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत आशा स्वयंसेविकांची भरती
पदाचे नाव : आशा स्वंयसेविका - ३६० जागा शैक्षणिक पात्रता : किमान…
-
केडीएमसीत कोरोना बाबतच्या उपाययोजनासाठी बैठक
प्रतिनिधी. कल्याण - मृत्युदर शुन्यावर आणण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुया…
-
महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेकडून महिलांना भाजीपाला लागवड प्रशिक्षण
प्रतिनिधी. ठाणे - जिल्ह्यातील अनेक गावात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला लागवडी…
-
केडीएमसीवर आशा कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी मोर्चा
कल्याण/प्रतिनिधी- वर्षानुवर्षे रखडलेल्या मागण्यांसाठी आशा कर्मचाऱ्यांचे १५ जून पासून राज्यव्यापी संप…
-
पदपथांवरील अतिक्रमणांविरुध्द आता कडक कारवाई
प्रतिनिधी. कल्याण - महापालिकेच्या नागरिकांना रस्त्यांवरुन व पदपथांवरुन कुठल्याही खोळंब्याशिवाय…
-
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- कायम विनाअनुदान तत्त्वावर नवीन खासगी…
-
पोलिसांच्या नैमित्तिक रजा आता २० दिवस
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राज्यातील पोलीस शिपाई ते…
-
कल्याण डोंबिवली महापालिकेवर आशा सेविकांचा मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - संपूर्ण महाराष्ट्रातील आशांच्या शासनाकडे प्रलंबित…
-
भंडारा शहरात रुटमार्चद्वारे कोरोना जनजागृती
प्रतिनिधी. भंडारा - कोरोना प्रार्दुभावामुळे राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. टाळेबंदीमध्ये…
-
आता केडीएमसीच्या ताफ्यात सीएनजीवर धावणाऱ्या घंटागाड्या
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कचरा संकलनासाठी…
-
आता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चिन्ह सर्व शासकीय पत्रव्यवहारांवर
मुंबई/प्रतिनिधी- सर्व प्रकारच्या शासकीय पत्रव्यवहारांवर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या चिन्हाचा (लोगो)…
-
डायमंड लीगपूर्वी फिनलंडच्या कुओर्टाने ऑलिम्पिक प्रशिक्षण केंद्रामध्ये नीरज चोप्रा प्रशिक्षण घेणार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक…
-
आता नवी मुंबईतही होणार तिरुपती देवस्थान
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - नवी मुंबईतील उलवे नोड…
-
आता ऑस्ट्रेलियात दूरदर्शन दिसणार
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली - भारत आणि ऑस्ट्रेलिया…
-
कल्याण मध्ये कोरोना थोपवण्यासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली मध्ये गेल्या तीन दिवसांपासून कोरोना रुग्णामध्ये वाढ…
-
कोरोना मुळे गणेश मूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकारांवर उपासमारीची वेळ
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण मधील प्रसिद्ध कुंभार वाडा परिसरात गणेश मूर्ती बनविल्या…
-
महाबँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण केंद्र,ठाणे यांच्या तर्फे मोफत फोटोग्राफी प्रशिक्षण
ठाणे/संघर्ष गांगुर्डे - महाबँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण केंद्र ,ठाणे…
-
नागपुरात वंचितची पदाधिकारी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर/प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय…
-
स्वच्छताकर्मीनाही आता आपत्ती व्यवस्थापनाचे धडे
नेशन न्यूज मराठी टीम. नवी मुंबई/प्रतिनिधी - नवी मुंबई शहर…
-
राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द
https://youtu.be/rdM7CNF72Bo
-
मोहोळ ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकारणाचा प्रारंभ
प्रतिनिधी. सोलापूर - गेल्या अनेक दिवसापासून प्रतिक्षेत असलेली कोरोना लस…
-
दक्षिण आफ्रिकेतून आलेला डोंबिवलीकर प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या नव्या ओमीक्रोन (omicron) कोवीड…
-
साऊथचा सुपरहिट चित्रपट 'गीता' आता मराठीत
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - बेवारस मुलांची कोणी फुकट…
-
आता सर्वच दुकानांवरील पाट्या मराठीत लावणे बंधनकारक
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई – दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत…
-
विविध मागण्यांसाठी हजारो आशा स्वयंसेविका रस्त्यावर
नेशन न्यूज मराठी टीम. जळगाव/प्रतिनिधी - शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा,…
-
तृतीयपंथीयांना समाजकल्याण विभागाकडून शेळीपालन प्रशिक्षण
नेशन न्यूज मराठी टीम. शिर्डी -तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी…
-
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मार्फत मोफत ऑनलाईन सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण
मुंबई प्रतिनिधी- डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),पुणे मार्फत पोलीस भरतीच्या…
-
आशा वर्कर महिलांकडून हरियाणा घटनेचा निषेध
नेशन न्यूज मराठी टीम. वर्धा / प्रतिनिधी - हरियाणा येथे…
-
मलेशियातील पोर्ट क्लांग येथे प्रथम प्रशिक्षण स्क्वाड्रन
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली /प्रतिनिधी - आग्नेय आशियामध्ये…
-
आता राष्ट्रवादी दहशतवादी मुक्त झाली - प्रमोद हिंदुराव
नेशन न्यूज मराठी टीम. https://youtu.be/jCWmu3arsSo कल्याण/प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेस दहशतवादी…
-
कोरोना रुग्णांची सेवा करणार रोबोट
प्रतिनिधी . कल्याण -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी…
-
विविध मागण्यांसाठी आशा वर्कर यांचे ठिय्या आंदोलन
नेशन न्यूज मराठी टीम. धुळे/प्रतिनिधी - राष्ट्रीय आरोग्य अभियानातील चार…
-
डोंबिवलीकरांचा पारंपारिक लेझिम प्रशिक्षण कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद
नेशन न्यूज मराठी टीम. डोंबिवली/प्रतिनिधी -डोंबिवलीच्या सांस्कृतिक विश्वात नावाजलेल्या आणि…