महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
राजकीय

शरद पवारांचे उमेदवार निवडून आल्यावर मोदींसोबत जाणार हे लक्षात घ्या -ॲड. प्रकाश आंबेडकर

नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.

बीड/प्रतिनिधी – राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण खाते आहे, त्यामुळे हा सुध्दा वजनदार माणूस आहे. या माणसाला आपण अचानक फोन का केलात ? काय बोलणे झाले ? लोकसभा झाल्यानंतर पुन्हा एकत्र येण्याची चर्चा झालीय का ? आणि तसे असेल, तर इथल्या मतदारांनी ते लक्षात घ्यावे की, भाजपचे उमेदवार काय आणि राष्ट्रवादी शरद पवारांचे उमेदवार काय, निवडून आले तर मोदींच्या सोबतच जाणार आहेत. असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बीड येथे केले. ते वंचितचे उमेदवार अशोक हिंगे यांच्या प्रचारार्थ बोलत होते.

बीड जिल्ह्याची निवडणूक रंगात आलेली आहे. बजरंग सोनावणे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने शरद पवार दोन दिवस इथे थांबणार आहेत. कालच्याच पत्रकार परिषदेत शरद पवारांना पक्षाच्या वतीने आम्ही विचारलं की, आपण एका बाजूला म्हणत आहेत की, भाजपला हरवलं पाहिजेत, सत्तेपासून खाली खेचलं पाहिजेत.
उद्या आपण तेच वाक्य वापरणार याची मला खात्री आहे. पण राजनाथ सिंह यांना आपण फोन का केला होता याचे उत्तर तुम्ही अजून दिलेले नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, राजनाथ सिंह यांच्याकडे संरक्षण खाते आहे, त्यामुळे हा सुध्दा वजनदार माणूस आहे. या माणसाला आपण अचानक फोन का केलात ? काय बोलणे झाले ? लोकसभा झाल्यानंतर पुन्हा एकत्र येण्याची चर्चा झालीय का ? आणि तसे असेल, तर इथल्या मतदारांनी ते लक्षात घ्यावे की, भाजपचे उमेदवार काय आणि राष्ट्रवादी शरद पवारांचे उमेदवार काय, निवडून आले तर मोदींच्या सोबतच जाणार आहेत. उद्या फसवले जाणार नाहीत, यासाठी मी इथल्या मराठा समाजाला आवाहन करतोय की, त्यांनी बजरंग सोनावणे यांना मतदान करू नये.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात शरद पवारांनी भूमिका घेतलीय का ? नरेंद्र मोदीने भूमिका घेतलीय का ? तर अजिबात घेतली नाही. जरांगे पाटील यांनी जे आंदोलन उभे केले, लाखो गरीब मराठा त्यांच्या पाठीशी आपल्या व्यथा घेऊन उभा राहिला. जरांगे पाटील यांनी उभे केलेलं आंदोलन नवीन आहे असे मी मानत नाही. १९८० पासून अण्णाराव पाटील यांनी उभे केलेलं आंदोलन, त्यानंतर शशिकांत पवार, त्यानंतर छावा संघटना, जिजाऊ संघटना यांना मोडायचे काम कोणी केले असेल, तर महाराष्ट्रातील एकमेव शरद पवार हे आहेत. शरद पवारांनी सगळ्या पुरोगामी चळवळी संपवल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

भारतीय जनता पक्ष पूर्णपणे बरबटलेला पक्ष आहे. आम्ही एससी, एसटीचे आरक्षण काढणार नाही असे ते म्हणतात. ही घटना जोपर्यंत राहील तोपर्यंत एससी, एसटीचे आरक्षण राहिलं ते कोणाला काढता येणार नाही. शिक्षण आणि सेवा यामधील आरक्षण कोणाला काढता येत नाही. असा ईशाराही त्यांनी दिला.

संविधान बदलले पाहिजे, ही भूमिका नरेंद्र मोदींची आहे. संविधान बदललं तर आरक्षण गेले आणि आरक्षण गेले हे लक्षात घ्या. मोदीसारखा खोटारडा माणूस दुसरा कोणीच नाही. जो माणूस स्वतःला देशापेक्षा मोठे मानतो. आणि त्या पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये आणि आरएसएसमध्ये हिंमत नाही की, त्याला विचारावं आणि रोखावं. अशा संघटनेच्या हातात या देशाची सत्ता जाणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

Translate »
×