नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
रत्नागिरी/प्रतिनिधी – रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ रत्नागिरीतल्या चिपळूणपासून सिंधुदुर्गातील सावंतवाडीपर्यंत पसरला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात 7 मे रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघात भाजपकडून नितेश राणे ऐवजी नारायण राणे यांच्यात तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात दोन्ही ही पक्षाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहे.
आपल्या प्रचारादरम्यान विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर हल्ला केला. “देशाची लोकसभा असते तिथे कॉपी करून पेपर सोडवता येत नाही. चांगली इंग्रजी, हिंदी,आणि मराठी बोलण्याची संधी लोकसभेत असते. नारायण राणे यांचे दिवे फक्त कुटुंबामध्ये लागले. दहा वर्षात काय केलं असा मला प्रश्न विचारला जातो. मी सांगतो दहा वर्षात काय केले? ते दहा वर्षात मी या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही.” असा टोला त्यांनी राणेंना लगावला आहे.