नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी टोरेंट या फ्रँचायजी कंपनीच्या भिवंडी व मुंब्रा संदर्भात ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी महावितरणतर्फे नोडल अधिकारी नियुक्त करण्याचे आश्वासन शुक्रवारी विधानसभेत दिले होते. त्यानुसार महावितरणतर्फे मुंब्रा, कळवा व शीळसाठी मंगळवारी व शुक्रवारी तर भिवंडीसाठी बुधवारी आणि गुरुवारी नोडल अधिकारी त्यांच्या व्यवस्थेसह उपस्थित असतील. नोडल अधिकाऱ्यांची सेवा उद्या, दि. २५ पासून उपलब्ध असेल, असे कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी सांगितले.
भिवंडी वितरण फ्रँचायजी विभागातील वीज ग्राहकांच्या सर्व प्रकारच्या तक्रारींच्या निवारणासाठी महावितरणचे कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता व उच्चस्तरीय लिपिक (लेखा) प्रत्येक आठवड्याच्या बुधवार व गुरुवार असे दोन दिवस सकाळी ११ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत भिवंडी नोडल कार्यालय येथे उपस्थित असतील. त्यांचा संपर्क क्रमांक ७५०७३३३८८१ आहे. कार्यालयाचा पत्ता – नोडल कार्यालय, म. रा. वि. वि. मंडळ कॉलनी, बिल्डिंग टाईप २, कल्याण रोड, भिवंडी पॉवर हाऊस, भिवंडी – ४२१ ३०२ आहे.
शीळ, मुंब्रा, कळवा वितरण फ्रँचायजी विभागातील वीज ग्राहकांच्या सर्व प्रकारच्या तक्रारींच्या निवारणासाठी महावितरणचे कार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, सहायक अभियंता व उच्चस्तरीय लिपिक (लेखा) प्रत्येक आठवड्याच्या मंगळवार व शुक्रवार असे दोन दिवस सकाळी ११ ते सायंकाळी ६.१५ या वेळेत शीळ, मुंब्रा, कळवा नोडल कार्यालय येथे उपस्थित असतील. त्यांचा संपर्क क्रमांक ८४११८४२२४४ आहे. कार्यालयाचा पत्ता – नोडल कार्यालय, टोरंट पॉवर लिमिटेड, तळमजला, अरिहंत आरोही बिल्डिंग, कोकण किंग हॉटेलजवळ, पडले गाव, कल्याण शीळ रोड, शीळ, ठाणे – ४२१ २०४.
दोन्ही ठिकाणचे ग्राहक thanedfnodal@gmail.com किंवा superthane@gmail.com या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतील. वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी टोरेंटची व्यवस्था आहे. तथापि, कंपनीकडून तक्रारीचे निरसन झाले नाही किंवा टोरेंटविरुद्ध तक्रार करायची असल्यास महावितरणच्या नोडल अधिकाऱ्यांकडे संपर्क साधता येईल.
—