नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे / प्रतिनिधी – ठाणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात कासारवडवली जंक्शन येथे घोडबंदर ठाणे वाहिनीवर ब्रिजचे काम करताना हलकी वाहने सर्व्हिस रोडने वळवावी लागणार आहेत. तसेच जड अवजड वाहने मुख्य रस्त्याने जाणार आहेत. त्यामुळे घोडबंदर ठाणे वाहिनीलगत ऑस्कर हॉस्पिटल ते आनंदनगर जंक्शनपर्यंत सर्व्हिस रस्त्याच्या दोन्ही बाजूस 1.5 कि.मी. अंतरावर 24 तास नो पार्किंग करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार मे. राठोड यांनी दिली आहे.
ही वाहतूक अधिसूचना कासारवडवली जंक्शन येथील उड्डाणपूलाचे काम पूर्ण होईपर्यंत अंमलात राहील. पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडोर, ऑक्सिजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे डॉ. विनयकुमार मे राठोड यांनी कळविले आहे.