नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण/संघर्ष गांगुर्डे – ठाणे जिल्हा महिला आघाडी तर्फे कर्मवीर दादासाहेब गायकवाड क्रीडांगण कल्याण येथे भव्य निर्धार सभा आयोजित करण्यात आली होती . या निर्धार सभेच्या उद्घाटक आदरणीय अंजलीताई आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ताई ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कल्याण मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या निर्धार सभेत अंजलीताई आंबेडकर यांची भाजपवर सडकून टीका केली त्या म्हणाल्या की, विरोधक शिल्लक ठेवायचे नाही खच्चीकरण करत लक्ष दुसरीकडे वळवणे ही भाजपची जुनी खेळी आहे.विरोधक शिल्लक ठेवायचे नाहीत. भाजपा विरोधी सुर संपूर्ण भारतात उमटू लागला आहे. आतापर्यंत शासकीय यंत्रणांचा गैरवापर या सरकार सारखा कोणीही केलेला नाही. स्वतःच्या हातात असलेल्या प्रशासकीय यंत्रणांचा गैरवापर आपल्या पद्धतीने करून घेऊन जे सरकार स्थापन झाले त्याच्यावरती कॉमेंट करण्याची मला काही गरज वाटत नाही. हे प्रचंड मोठ षडयंत्र आहे.अशी टीका त्यानी यावेळी केली.आम्हाला ईडीची भीती नाही कारण आमचे व्यवहार स्वच्छ आहेत. असहि या वेळी त्यांनी सागितले.
राहुल गांधी यांच्या विषयी माध्यमांनी विचरण केली असता त्या म्हणाल्या गुजरात न्यायालयाने निकाल दिल्यानंतर या निकालावर स्थगिती आदेश देत राहुल गांधींना उच्च न्यायालयात जाण्याची संधी दिली आहे.त्यामुळे जोपर्यत उच्च न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत कोणीही कारवाई करायची नसते.हे स्पष्ट असतानाही राहुल गांधीं विरोधात केवळ सूडबुद्धीने कारवाई करण्यात आल्याचे मत त्यांनी मांडले.
आक्रोश मोर्चा भाजप च्या आणि मोदीं च्या विरोधातला असयला हवा.कशा बद्दल चा हा आक्रोश मोर्चा भारतातील सगळी सत्ता त्यांच्या हातात आहे.ज्यांच्या हातात सत्ता आहे असे सगळे इंडस्ट्रियललिस्ट अदानी सोबत आहे.त्यांनी देशाला फसवून मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांचा पैसा उभारलेला आहे.हे सर्व समोर येत असताना खरं म्हणजे आक्रोश मोर्चा भाजपच्या आणि मोदींच्या विरोधातला असयला हवा. त्यामुळे भाजप नक्की कशामुळे आक्रोश करतं हे कळायला हवं. असे मत मांडत भाजपवर त्याबरासल्या
ज्या अडानीच्या फायद्याचे निर्णय घेतले गेले, सर्व प्रशासन आदानींच्या बाजूने उभे होते. यामुळे या सगळ्याला सरकारच जबाबदार आहे. एलआयसी मध्ये सर्वसामान्यांचा पैसा मोठ्या प्रमाणावर गुंतलेला आहे त्यामुळे सरकारला उत्तर द्यावेच लागेल.असा सावळी या वेळी त्यांनी केला,
यावेळी वंचित बहुजन महिला आघाडीच्या महासचिव अरुंधतीताई शिरसाठ व प्रदेश उपाध्यक्ष सिध्दार्थ मोकळे कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्ष मायाताई कांबळे आहेत. मुंबई प्रदेश अध्यक्ष अबुल हसन खान, मुंबई प्रदेश महिला आघाडी अध्यक्ष सुनिताताई गायकवाड, ठाणे जिल्हाध्यक्ष भगवान गायकवाड, भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड कल्याण पूर्व अध्यक्ष बाबू तलाठी त्याच प्रमाणे सर्व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.