नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम.
नाशिक/प्रतिनिधी – कोणी कितीही नायलॉन मांजा वापरला तरी आम्हाला त्याचा काही फरक पडणार नसून आमच्या येवला मतदार संघातील लोकशक्तीचा मांजा भक्कम आहे, असे म्हणत भुजबळाने विरोधकांना टोला लगवला आहे. आज मंत्री छगन भुजबळ येवला दौऱ्यावर आले असताना यावेळी ते बोलत होते.
कोणी नायलॉन वापरा ज्याची बंदी आहे तरी काही लोक त्याचा वापर करतात, असा टोला भुजबळांनी आपल्या येवल्यातील विरोधकांना लगावला. मी येवल्यात अनेकवेळा पतंग उडवायला आलो आहे. पतंग उडवल्या आहेत अनेकांचे पतंग कापले आहेत. यापुढे येत राहणार असून अनेकांचे पतंग कसे कापायचे त्याचे ट्रेनिंग घेतले असल्याचे सांगत भुजबळांनी आपल्या विरोधकांना यावेळी इशारा दिला आहे.
भुजबळांनी काल बीड येथील सभेत केलेल्या टीकेला मनोज जरांगे यांनी उत्तर देत पिस्टल आणले कोठून त्यांना कसे माहीत भुजबळांची गृहमंत्री, मुख्यमंत्री यांनी चौकशी करावी अशी मागणी केली. यावर विचारले असता प्रतिष्ठित वर्तमान पत्रांनी ही बातमी केली, त्यांनी शोध पत्रकारिता करत ही बातमी दिली त्यामुळे मी जे बोललो त्याचा इन्कार कोणी केलेला नाही, जे लोक पकडले गेले त्यामुळे काहींच्या जीवाची तगमग होऊन सोडा त्यांना त्यामुळे जर पिस्तुल आले असेल तर त्याची चौकशी व्हावी, असे भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले.