मुंबई/प्रतिनिधी – कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीज निर्मिती कमी झाली असून गरजेनुसार खुल्या बाजारातून महागड्या दराने वीज खरेदी करून ग्राहकांची विजेची गरज भागवली जात आहे. राज्यात कुठेही भारनियमन केले जात नसून वीज उत्पादन वाढविण्यासाठी योग्य नियोजन केले जात आहे, अशी माहिती ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी दिली आहे. राज्यातील कोळसा टंचाई आणि त्यामुळे वीज निर्मितीत झालेली घट या विषयावर मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.राज्यात मागणीच्या तुलनेत 3 हजार मेगावॅट विजेची कमतरता जाणवत आहे. ही विजेची तूट भरून काढण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी यावेळी सांगितले.
“राज्यातील महानिर्मितीच्या औष्णिक प्रकल्पांना कोळशाचा नियमित पुरवठा व्हावा, यासाठी मी मागील दोन महिन्यांपासून केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी व केंद्रीय ऊर्जा मंत्री आर.के.सिंग यांच्याशी नियमित संपर्कात असून लवकरच या संकटावर मात करू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“या पार्श्वभूमीवर सर्व ग्राहकांना जाहीर नम्र आवाहन करू इच्छितो की, सध्याची वीज टंचाईची परिस्थिती लक्षात घेता सकाळी व संध्याकाळी 6 ते 10 या वीज मागणीच्या कमाल कालावधीत आपल्या घरातील विद्युत उपकरणांचा कमीत कमी वापर करून वीज बचत करून महावितरणला सहकार्य करावे,” असे आवाहन ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी यावेळी जनतेला केले.
ऊर्जामंत्री डॉ.राऊत म्हणाले, महानिर्मितीची एकूण स्थापित क्षमता 13 हजार 186 मेगावॅट आहे. याशिवाय अन्य कंपन्यांकडूनही महावितरण वीज खरेदी करीत असते. कोळसा टंचाईमुळे चार आणि देखभाल दुरूस्तीमुळे तीन असे सात संच बंद असल्याने राज्याला तीन हजार मेगावॅट विजेची तूट जाणवू लागली आहे. महानिर्मितीने कोळसा आणि वीज उत्पादन व्यवस्थापनात उत्तम समन्वय आणि संतुलन साधारणपणे पावसाळ्यात म्हणजे जून-सप्टेंबरपर्यंत विजेच्या मागणीत घट होत असते. परंतु, ऑगस्ट महिन्यात दुर्देवाने पावसाने ताण दिला व त्यामुळे विजेची मागणी प्रचंड वाढली. त्यामुळे या मागणीची पूर्तता करण्यासाठी 18 लाख मेट्रिक टन कोळसा साठा वापरावा लागला. कोळसा वाहून नेण्याची कोल इंडियाची रोजची क्षमता 40 लाख मेट्रिक टन आहे. मात्र पावसामुळे ती 22 लाख मेट्रिक टन इतकी खाली आली होती. ती आता 27 लाख मेट्रिक टनापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे कोल इंडियाने आपल्या वहन क्षमतेनुसार पुरवठा करावा, यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचेही डॉ.राऊत यांनी यावेळी सांगितले.
या व्यतिरिक्त जो कोळसा कोल इंडियाकडून मिळतो तोही अपेक्षित दर्जाचा नाही. त्यामुळे विजेचे उत्पादन व गुणवत्ताही अपेक्षित प्रमाणानुसार होत नाही. याशिवाय गॅसवर वीज निर्मिती प्रकल्पांसाठी करारानुसार गॅस मिळत नसून फक्त 30 टक्केच गॅस पुरवठा महाराष्ट्राला केला जात आहे. या संकटात भर म्हणून ज्यांच्याशी दीर्घकालीन करार केलेले आहेत अशा सीजीपीएल आणि जेएसडल्बू या कंपन्यांनी स्वस्त वीज पुरवठा बंद केलेला आहे. त्यामुळे एक हजार मेगावॅट विजेचा पुरवठा त्यांच्याकडून केला जात नाही. या कंपन्यांनी वीज निर्मितीच बंद ठेवली आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी यावेळी दिली.
“कोळसा पुरवठा वाढावा म्हणून 5 ऑगस्ट रोजीच कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्र पाठवले आणि राज्याला ठरल्याप्रमाणे कोळसा पुरविण्याची विनंती केली. 24 सप्टेंबर रोजी केंद्रीय कोळसा मंत्री व केंद्रीय ऊर्जा मंत्री आर.के.सिंग यांच्याशी दूरध्वनीवर संभाषण झाले. 21 सप्टेंबर रोजी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव व महानिर्मितीचे सीएमडी व ज्येष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी सचिवांना दिल्लीत जाऊन कोळसा व ऊर्जा विभागाच्या सचिवांशी यासंदर्भात संवाद साधण्यास सांगितले. संचालकांना कोल इंडिया लिमिटेडच्या प्रमुखांना भेटून बोलायला सांगितले. तसेच जेथून कोळसा पुरवठा केला जातो त्या कोळसा खाणीत महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना पाठवून कोळसा उपलब्धतेचा आढावा घेण्यास सांगितले. त्याचबरोबर आमचे संबंधित अधिकारी केंद्र सरकारमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना भेटून आले व त्यांनी पाठपुरावा सुरू केला,” अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 च्या सुमारास विशेष म्हणजे शिखर मागणी (पीक डिमांड) काळात महानिर्मितीने औष्णिक, वायू आणि जल विद्युत केंद्रांतून 8 हजार 119 मेगावॅट इतकी वीज निर्मिती करून कोळश्याच्या कमतरतेच्या काळात सुद्धा राज्याच्या वीज ग्राहकांना पुरेशी वीज उपलब्ध करून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. महावितरणने सुद्धा त्यांची मुंबई वगळता एकूण विजेची मागणी 18 हजार 123 मेगावॅट आणि मुंबईसह एकूण मागणी 20 हजार 870 मेगावॅट सायंकाळी 7 च्या शिखर मागणीच्या सुमारास उद्दिष्टपूर्ती केली असल्याचेही ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी सांगितले.
Related Posts
-
वीज कंपन्यांचे खासगीकरण होऊ देणार नाही – ऊर्जामंत्री नितीन राऊत
नेशन न्यूज मराठी टीम. शिर्डी - महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या…
-
लोकअदालतीच्या माध्यमातून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याची वीज ग्राहकांना संधी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा…
-
वीज ग्राहकांना लोक अदालतीतून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याची संधी
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी…
-
९ सप्टेंबरला लोक अदालतीतून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याची वीज ग्राहकांना संधी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण परिमंडलातील कायमस्वरूपी वीजपुरवठा…
-
अपघात टाळण्यासाठी पावसात वीज यंत्रणेपासून सतर्क राहण्याचे महावितरणचे आवाहन
नेशन न्यूज़ मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे- वादळी व संततधार पाऊस…
-
महावितरणचे नागरिकांना आवाहन, पावसात वीज यंत्रणेपासून सतर्क रहा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - वादळी व संततधार पाऊस…
-
अखंड वीजपुरवठ्यासाठी ग्राहकांना नियमित वीजबिले भरण्याचे महावितरण कडून आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - महावितरणच्या उत्पन्नाच्या सुमारे ८०…
-
ठाण्यातील वेहळोली वगळता अन्यत्र कुठेही बर्ड फ्लूची लागण नाही, नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे - ठाणे जिल्ह्यातील मौजे वेहळोली, ता.शहापूर येथे…
-
एस.टी. कर्मचाऱ्यांऱ्याना आवाहन, कोणाचीही नोकरी जाणार नाही, ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू व्हा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांवर आमचा कोणताही…
-
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात…
-
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना आवाहन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- कायम विनाअनुदान तत्त्वावर नवीन खासगी…
-
वीज कंपनीत मेघा भरती
प्रतिनिधी. मुंबई - ऊर्जा विभागाच्या महापारेषण या वीज कंपनीत जवळपास…
-
डोंबिवलीत वीज वितरण यंत्रणेला आग
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - रोहित्राजवळ टाकलेल्या कचऱ्याला…
-
अनियमित वीज पुरवठ्याचा कापूस लागवडीवर परिणाम
DESK MARATHI NEWS ONLINE. जळगाव/प्रतिनिधी - जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात…
-
वीज कर्मचाऱ्याला मारहाण; आरोपीला पोलिस कोठडी
उल्हासनगर/प्रतिनिधी - थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित करणाऱ्या कंत्राटी वीज कामगाराला…
-
महावितरणने केडीएमसीच्या सिग्नल यंत्रणेची कापली वीज
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बसवण्यात…
-
परभणीत वीज पडून तीन ठार; तीन जखमी
नेशन न्यूज मराठी टीम. परभणी/प्रतिनिधी - गंगाखेड तालुक्यातील डोंगरपिंपळा आणि…
-
चंद्रपुरात वीज कंत्राटी कामगारांच्या बेमुदत कामबंद आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. चंद्रपूर/प्रतिनिधी - संपूर्ण महाराष्ट्रात वीज…
-
लोकअदालतीतून वीज ग्राहकांची ३८८ प्रकरणे निकाली
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण/ प्रतिनिधी- कल्याण,वसई,पालघर,तालुकास्तरावर नुकत्याच आयोजित राष्ट्रीय…
-
महावितरणच्या वसई विभागात वीज चोरांविरुद्ध धडक कारवाई
नेशन न्यूज मराठी टीम. वसई / प्रतिनिधी - महावितरणच्या वसई…
-
कल्याणात महावितरणची वीज चोरी विरुद्ध धडक कारवाई
प्रतिनिधी. कल्याण - महावितरणच्या कल्याण पूर्व उपविभाग- एक अंतर्गत वीज…
-
वीज कंत्राटी कामगार संघाची उच्च न्यायालयात धाव
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - महावितरण कंपनीत EWS…
-
वीज कंत्राटी कामगार संघाची कामगारांच्या पगार वाढीची मागणी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/ प्रतिनिधी - वीज कंत्राटी कामगारांना…
-
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी ऑनलाईन नावनोंदणी करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना प्रातिनिधिक स्वरूपात…
-
लोड शेडिंग विरोधात वीज वितरण कार्यालयावर शिवसैनिकांचा मोर्चा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण आणि अंबरनाथ ग्रामीण परिसरातील मंलगगड…
-
उत्कृष्ट निर्यात पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या वतीने उत्कृष्ट…
-
वादळी वाऱ्यात शेतकाम करणाऱ्या महिलेवर वीज पडून मृत्यू
नेशन न्यूज मराठी टीम. नांदेड / प्रतिनिधी - हिमायतनगर तालुक्यातील…
-
वीज कंत्राटी कामगार संघांचे 'सरकार जगाव' अभियान
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र वीज कंत्राटी…
-
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठीच्या व्यावसायिक…
-
यावर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा नाही
नागपूर/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या…
-
टाटा औष्णिक वीजनिर्मिती केंद्राला ऊर्जामंत्री यांची भेट
प्रतिनिधी. मुंबई - मुंबईत दि. १२ ऑक्टोबर रोजी घडलेल्या वीजपुरवठा…
-
मधमाशी मित्र पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी - मध संचालनालय महाराष्ट्र राज्य…
-
शहापूर परिसरातील २३ वीज चोरी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - महावितरणच्या पथकांनी वीजचोरी उघडकीस…
-
लोकअदालतीच्या माध्यमातून वीज ग्राहकांची १९३० प्रकरणे निकाली
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - तालुकास्तरावर रविवारी आयोजित…
-
सुरक्षा लेखा परिक्षकांस मान्यतेकरिता अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई- संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयात सुरक्षा लेखा परीक्षक म्हणून…
-
पालघर, मोहने, टिटवाळ्यात वीज चोरट्यांना महावितरणच्या कारवाईचा शॉक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महावितरणच्या अधिक वीजहानी…
-
कल्याण मध्ये महावितरणची ३९ वीज चोरी करणाऱ्यांवर कारवाई
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण - महावितरणच्या कल्याण पश्चिम विभागात…
-
राज्य कला प्रदर्शनासाठी ऑनलाईन पद्धतीने कलाकृती पाठविण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. मुंबई/प्रतिनिधी - राज्य कला प्रदर्शनाचे…
-
महावितरणला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - ‘इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन…
-
वीज कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत प्रश्नांवर उर्ज्यामंत्री यांच्या उपस्थितीत बैठक
प्रतिनिधी. मुंबई - वीज कामगारांच्या प्रश्नांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ते त्वरित…
-
कल्याणात शिवसेना कार्यकर्त्यांनी केले बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या…
-
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य…
-
आयजीआरयूएने आतापर्यंतचे सर्वाधिक उड्डाणाचे तास केले पूर्ण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - इदिरा गांधी राष्ट्रीय…
-
गं.द.आंबेकर पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
मुंबई प्रतिनिधी - कामगार चळवळीत प्रतिष्ठेच्या आणि मानाच्या स्व.गं.द.आंबेकर श्रम…