Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
Default Image ठाणे

पत्रीपुलावर रात्री नो एन्ट्री नव्या पुलाच्या कामासाठी जुन्या पुलावरील वाहतूक रात्रीपासून पहाटेपर्यत बंद

प्रतिनिधी.

कल्याण – कल्याण शहरातील महत्वाच्या पत्रीपुलाचे काम मागील 2 वर्षापासून सुरु असून आता या पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरु होणार आहे. मात्र यासाठी मोठी क्रेन जुन्या पुलावर ठेऊन गर्डर उचलावे लागणार असून रात्री हे गर्डर टाकले जाणार आहेत. यामुळे बुधवारी रात्रीपासून सोमवार 24 ऑगस्ट पर्यत रात्री 10 ते पहाटे 5 पर्यत या पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार असून या वेळेत या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावरून वळविण्यात आल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी काढले आहेत.

 कल्याणातील पत्रीपुलावर गर्डर टाकण्यासाठी जुन्या पुलावरून होणारी वाहतूक बुधवारी म्हणजे आज रात्रीपासून कल्याण शिळ रोड वरून जाणार्या जड आणि अवजड वाहनांना रांजनोली नाक्यावरून प्रवेश बंद करण्यात आला असून हि वाहने रंजनोली नाक्यावरून भिवंडी येथून खारेगाव टोलनाका मुंब्रा बायपास मार्गे जातील. तर शिळरोड वरून जाणार्या हलक्या वाहनांना दुर्गामाता चौकात प्रवेश बंद करण्यात आला असून हि वाहने आधारवाडी चौक खडकपाडा चौकातून वालधुनी पुलावरून कल्याण पूर्वेतून इच्छित स्थळी जातील. तर कल्याण नगर मार्गावरील वाहनांना सुभाष चौकात प्रवेश बंद करण्यात आला असून हि वाहने नेताजी चौकातून वालधुनी पुलावरून इच्छित स्थळी मार्गस्थ होतील. कल्याण शिळफाटा रोड वरून पत्रीपुलाकडे जाणार्या वाहनांना सूचक नाका येथे प्रवेश बंद करण्यात आला असून हि वाहने कल्याण पूर्वेतील सूचक नाका येथे उजवीकडे वळण घेऊन मार्गस्थ होतील. तर पश्चिमेकडे जाणारी वाहने कल्याण फाट्यावरून खारेगाव टोल नाका येथून रवाना होतील. बुधवार पासून हे बदल केले जाणार असून वाहनचालकांनी हे बदल लक्षात घेत प्रवास करावा असे आवाहन वाहतूक पोलिसाकडून करण्यात आले आहे. 

Translate »
X