महत्वाच्या बातम्या

बांगलादेशमधून भारतात विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंधसेवा पंधरवड्यात वीज ग्राहकांच्या १ हजार ६१४ तक्रारींचे निवारणडोंबिवलीत फेरीवाल्यांचे धरणे आंदोलनइराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेटमागेल त्याला सौर कृषी पंप – बनावट कॉलला बळी पडू नकाकेंद्र सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय फसवा! – ॲड. प्रकाश आंबेडकरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवलीतील शाहिद कुटुंबांची घेतली भेटप्रमुख तूर उत्पादक राज्यांमध्ये तूर खरेदी सुरूभारतीय नौदलाद्वारे मेघायन-25परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी शांतता मार्चसावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून रिक्षा चालकाची आत्महत्याडोंबिवली स्फोट प्रकरणातील कामगारांच्या कुटुंबियांची सरकारला मदतीची हाककल्याणात होणाऱ्या मतमोजणीसाठी ६०० प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्तीछ.संभाजीनगरच्या पोलिस आयुक्तपदी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांची नियुक्तीठाणे रेल्वे स्थानकातील ५ नंबर प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण अंतिम टप्प्याततीन दिवसांच्या जम्बो मेगाब्लॉकमुळे पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीरेल्वे प्रशासनद्वारे नियोजित मेगा ब्लॉकचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेधमध्य रेल्वेवरील मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करुन देण्याची प्रवासी संघटनेची मागणीमहावितरण कंपनीचा भोंगळ कारभार,७२ तासांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्याने ठिय्या आंदोलनआता एकाच क्लिकवर भरा बिल,नव्या सुविधेचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहनकापूस जिनिंगला लागलेल्या आगीत कंपनीचे नुकसानउन्हाच्या चटक्यामुळे २४ जणांवर रुग्णालयात दाखल होण्याची वेळशहरात पाणीपुरवठा होत नसल्याने राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमकभीषण पाणी टंचाईच्या वाडी तांड्यांना झळा,घोटभर पाण्यासाठी मैलभर वणवणडीआरआयने मुंबईतून कोटींचे परदेशी सिगारेट केले जप्त
Default Image ठाणे लोकप्रिय बातम्या

कल्याण प्रांत कार्यलयावर मूलभूत सुविधांपासून वंचित आदिवासी बांधवांचा निर्धार मोर्चा

नेशन न्युज मराठी टीम.

कल्याण – कल्याण मुरबाड तालुक्यात आदिवासी बांधव आज ही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. आदिवासी बांधवाना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत आज श्रमजीवी संघटनेच्या नेतृत्वाखाली आज शेकडो आदिवासी बांधवांनी कल्याण प्रांत कार्यलयावर निर्धार मोर्चा काढत कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन केलं. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष उलटली मात्र आजही आदिवासी बांधव त्यांच्या मूलभूत हक्का व अधिकारा पासून वंचित असल्याची खंत यावेळी आदिवासी बांधवांकडून व्यक्त करण्यात आली. यावेळी श्रमजीवी संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रामभाऊ वारणा, महाराष्ट्र राज्य जनरल सरचिटणीस बाळाराम भोईर, ठाणे जिल्हा सरचिटणीस राजेश चन्ने, शेतकरी सचिव सुरज रजपूत, कल्याण तालुका अध्यक्ष वासुदेव वाघे, विष्णू वाघे आदि पदाधिकाऱ्यांसह मोठ्या संख्येने आदिवासी माहिला आणि पुरुष मोर्चात सहभागी झाले होते.

वनजमीनीचा कायदा होऊन १५ वर्ष उलटले मात्र अद्यापही आदिवासी बांधवाना हक्क मिळाला नाही. आजही मुरबाड येथे २८२  तर कल्याण येथे २०७ दावे प्रलंबित आहेत. अन्न अंतोदय योजनेसाठी आदिवासी बांधवांना सामावून घेत त्यांना या योजनेचा लाभ घ्यावा. अन्न अंतोदय, द्वितीय अन्न अंतोदय, तृतीय अन्न अंतोदय योजनेची प्रभावी अमलबाजवणी करावी. ऑनलाइन न झालेल्या शिधा पत्रिका धारकांना ऑफलाईन धान्य द्या. शासकीय आकारपड गुरचरण प्राधिकरण खाजगी व वन जमिनीमध्ये असलेल्या आदिवासी कुटुंबाची घराखाली जागा नावे करण्याचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करा.

आदिवासी विद्यार्थ्यांना शाळेतच जातीच्या दाखल्याचे कॅम्प आयोजित करा. १९५० पूर्वीची जाचक अट शिथिल करत आदिवासी कुटुंबाना जातीचा दाखला देण्याची तत्काळ व्यवस्था करा. आदिवासी पाड्यांना शुद्ध मुबलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा आदी मागण्यांचे निवेदन प्रांत कार्यलयाला श्रमजिवी संघटनेने सादर केले. यावेळी मागण्या मान्य झाल्या नाही तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »