नेशन न्यूज मराठी टिम.
कल्याण/प्रतिनिधी – अलिकडेच यूनेस्कोकडून आशिया पॅसिफिक वैश्विक सांस्कृतिक वारसा संरक्षण पुरस्काराने सम्मानित मुंबईतील 169 वर्षे जुने भायखळा स्टेशन रेल्वे ॲथॉरिटीजच्या मागणीनुसार संत निरंकारी मिशनमार्फत स्वच्छता अभियान राबवून चकाचक करण्यात आले. त्याबरोबरच या स्टेशनच्या परिसरात मिशनचे अनुयायी तसेच रेल्वे अधिकाऱ्यांनी मिळून 35 झाडे लावण्यात आली.
रविवारी निरंकारी स्वयंसेवकांद्वारे सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या जयघोषाबरोबर निरंकार प्रभुची प्रार्थना करत या अभियानाला सुरवात करण्यात आली. या अभियानामध्ये संत निरंकारी सेवादलाच्या ६ युनिटमधील 142 महिला व पुरुष स्वयंसेवक आणि अन्य 38 भक्तांनी या अभियानासाठी आपल्या निष्काम सेवा अर्पण केल्या.
अभियाना दरम्यान भायखळा रेलवे स्टेशनचे प्रबंधक गणेश स्वैनजी यांच्या अतिरिक्त ट्रान्सपोर्टेशन इन्स्पेक्टर अश्विन कुमार सिंग, सिनियर डिवीजनल ऑपरेशन मैनेजर राजन कुमार मोदी, उप स्टेशन प्रबंधक वंदराज गजबे, आरपीएफ इन्स्पेक्टर उपेन्द्र दागर, आरपीएफ सब-इन्स्पेक्टर राजकुमार वारसे आणि आरपीएफ सहायक उप निरीक्षक मोहन रांधे आदि उपस्थित होते.
संत निरंकारी मंडळाच्या दादर विभागाची सेक्टर संयोजक पूजा चुघ यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले. या प्रसंगी मंडळाचे अन्य सेक्टर संयोजक गोपीनाथ बामुगडे, सेवादल क्षेत्रीय संचालक शंकर सोनवणे तसेच मंडळाच्या वरळी ब्रँचचे मुखी दिनेश गवलकर आदिंनी उपस्थित राहून सेवादारांचा उत्साह वाढविला.
वननेस वन समूह वृक्षारोपण व संवर्धन
रविवारी कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस, चेंबूर येथील घाटला व्हीलेज, मरोळ पोलीस वसाहत आणि नवी मुंबई येथील कोपरखैरणे भागात ठाणे-बेलापूर महामार्गालगत चालविण्यात येत असलेल्या ‘वननेस वन’ समूह वृक्षारोपण व संवर्धन ठिकाणांची देखभाल, स्वच्छता व सुशोभिकरणाचे कार्य करण्यात आले. या परियोजने अंतर्गत 3 वर्षांपूर्वीपासून लावण्यात आलेल्या झाडांचे संगोपन व संरक्षण करण्याचे कार्य मिशनमार्फत सातत्याने केले जात आहे. या परियोजनेच्या तिसऱ्या टप्प्याचा शुभारंभ करत मंडळाच्या वतीने काल देशभरात समूह वृक्षारोपण करण्यात आले. त्यामुळे प्रथम टप्प्यात 317 आणि दुसऱ्या टप्प्यात 403 ठिकाणांची संख्या वाढून आता 500च्या वर गेली आहे.
काळा चौकी येथे रक्तदान शिबिर
संत निरंकारी मिशनच्या वतीने काळाचौकी व शिवड़ी या दोन शाखांनी मिळून रविवारी अहिल्या विद्या मंदिर स्कूल, काळाचौकी येथे आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 172 निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. या शिबिराचे उद्घाटन सेक्टर संयोजक पूजा चुघ यांच्या हस्ते करण्यात आले. या भागातील मंडळाचे यापूर्वीचे सेक्टर संयोजक तसेच वयोवृद्ध संत रमेश बामणे यांनी रक्तदान शिबिरामध्ये उपस्थित राहून रक्तदात्यांचा उत्साह वाढविला.