Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
मुख्य बातम्या राजकीय

मविआ चे उमेदवार निलेश लंके यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

नेशन न्यूज मराठी ऑनलाईन टीम.

अहमदनगर /प्रतिनिधी – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सर्वच पक्षाचे राजकीय नेते महाराष्ट्रभर फिरत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी दक्षिण नगरमधून निलेश लंके हे भाजप उमेदवार सुजय विखे-पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवणार आहेत. निलेश लंके यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळेस मतदारसंघातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि नेतेमंडळी उपस्थित होते. निलेश लंके यांनी एतर उमेवारांसारखे शक्तीप्रदर्शन न करता अत्यंत साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज भरला ज्याची आता सगळीकडे चर्चा होत आहे.

निलेश लंके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी लंकेंच्या हंगा गावातील निवासस्थानी त्यांच्या आई, पत्नी तसेच स्थानिक महिलांनी औक्षण केले. यानंतर लंके यांनी ग्रामदैवताचे दर्शन घेतले. यादरम्यान ग्रामस्थ तसेच लंकेंच्या समर्थकांनी त्यांच्यावर फुलांची उधळण करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.

Translate »
X