नेशन मराठी ऑनलाइन टिम.
ठाणे/प्रतिनिधी– ठाणे महानगरपालिका हद्दीत मेट्रो 4 चे काम सुरू असून आनंदनगर ते कासारवडवली दरम्यान यु गर्डर टाकण्याचे वेळी घोडबंदर ते ठाणे वाहिनी वाहतुकीस बंद करण्यात येणार असल्याने, वाहतूक कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित राहण्यासाठी दि.1 ते 28 नोव्हेंबर या कालावधीत रात्री 11.00 ते सकाळी 5.00 वाजेच्या दरम्यान या परिसरातील वाहतुकीत बदल करण्यात आले असल्याची माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त डॉ. विनयकुमार मे. राठोड अधिसूचनाद्वारे कळविली आहे.
वाहतुकीतील बदल पुढीलप्रमाणे –
प्रवेश बंद – 1) मुंबई, ठाणे कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात आले आहे.
पर्यायी मार्ग – अ) ही वाहने कापूरबावडी वाहतूक शाखा जवळून उजवे वळण घेवून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील. ब) ही वाहने कापूरबावडी जंक्शन जवळून उजवे वळण घेवून कशेळी, अंजूर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद – 2) मुंब्रा, कळवा कडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना खारेगाव टोलनाका येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग – ही वाहने गॅमन मार्गे खारेगाव खाडी ब्रिजखालून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद – 3) नाशिककडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या सर्व जड, अवजड वाहनांना मानकोली नाका येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग – ही वाहने मानकोली ब्रिज खालून उजवे वळण घेवून अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.
अ) पातलीपाडा येथे यु गर्डर P 113 114 चे काम करताना पातलीपाडा ब्रिजखालून हिरानंदानी पातलीपाडा कडे जाणारी वाहने पातलीपाडा ब्रिजवरून जावून वाघबीळ ब्रिजखालून यु टर्न घेवून पुढे इच्छित स्थळी जातील.
ब) कासारवडवली येथे यु गर्डरचे काम करताना आनंदनगर सिग्नल जवळून सेवा रस्त्याने जावून पुढे कासारवडवली पेट्रोल पंपजवळ उजवे वळण घेवून मुख्य रस्त्याने पुढे इच्छित स्थळी जातील.
ही वाहतूक नियंत्रण अधिसूचना ही पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर, ऑक्सीजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे डॉ. परोपकारी यांनी कळविले आहे.