नेशन न्युज मराठी टीम.
कल्याण– कोवीड रुग्णांसह ओमीक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये शुक्रवार रात्रीपासून नविन निर्बंध घालण्यात आले आहेत. राज्य सरकारपाठोपाठ कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही शनिवारी रात्री उशिरा केडीएमसी क्षेत्रासाठी हे नवे निर्बंध लागू झाल्याचे आदेश काढले आहेत. ज्यामध्ये रात्री 9 ते सकाळी 6 दरम्यान जमावबंदीच्या आदेशासह सार्वजनिक कार्यक्रम आणि हॉटेलमधील आसन क्षमतेवरही मर्यादा घालण्यात आली आहे.
ओमीक्रॉनच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध लावावेत आणि पुढील काळात याचा प्रसार बघून अधिक निर्बंध लावण्याबाबत विचार व्हावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यानूसार संपूर्ण राज्यात हे प्राथमिक स्तराचे हे निर्बंध लावण्यात आले आहेत.
गेल्या काही आठवड्यांपासून 15 ते 25 च्या आसपास स्थिरावलेली कल्याण डोंबिवलीतील कोवीड रुग्ण संख्याही या आठवड्यामध्ये थेट 38 पर्यंत पोहचल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यात ख्रिसमस, लग्न समारंभ, नवीन वर्षाचे स्वागत यामुळे गर्दी वाढून कोवीड संसर्गाचा धोकाही वाढण्याची शक्यता आहे.
बघा केडीएमसी क्षेत्रात असे आहेत निर्बंध
संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत बंदी असेल.
उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच ५० टक्के क्षमतेची संख्या जाहीर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल इतके असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल. किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल तितक्या संख्येला एकाच वेळी उपस्थित राहण्याची परवानगी राहील.
उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशाठिकाणी क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी २५ टक्के उपस्थिती असेल. अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना २७ नोव्हेंबर २०२१ चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल.



Related Posts
-
कल्याणात सकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत अवजड वाहनांना प्रवेशबंदी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - गेल्या दोन दिवसांपासून मोठे…
-
नियम पाळा अन्यथा निर्बंध आणखी कठोर - केडीएमसी आयुक्त
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवलीमध्ये वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्या पाहता कल्याण डोंबिवली…
-
दिलासादायक बातमी,केडीएमसी क्षेत्रातील निर्बंध झाले शिथिल
कल्याण/प्रतिनिधी - राज्य सरकारने केलेल्या घोषणेनुसार कल्याण डोंबिवलीतील कोवीड निर्बंधही…
-
केडीएमसी क्षेत्रात १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला १७ मार्च पासून सुरुवात
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात,…
-
पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊनंतर भरवण्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून सूचना
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी – राज्यातील सर्व माध्यमांच्या…
-
केडीएमसी क्षेत्रातील आरटीई प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या कागदपत्राची १३ ते २५ एप्रिला पडताळणी
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - बालकांचा मोफत व…
-
राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू; रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत जमावबंदी
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार…
-
केडीएमसी निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - एकिकडे राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची…
-
आता रेस्टॉरंट रात्री १२ वाजेपर्यंत तर इतर दुकाने रात्री ११ पर्यंत सुरू राहणार
मुंबई/प्रतिनिधी- कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी राज्य शासनाने अनेक निर्बंध…
-
वंचितचा केडीएमसी मुख्यालयावर हंडा कळशी मोर्चा
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील २७ गावांसह टिटवाळा…
-
शोभायात्रेत केडीएमसी कडून स्वच्छतेबाबत जनजागृती
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - नववर्ष दिनी अर्थातच गुढीपाडव्याच्या…
-
केडीएमसी प्रशासन गणेशोत्सव विसर्जनासाठी सज्ज
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - यंदाच्या गणेशोत्सव विसर्जनासाठी कल्याण…
-
नेहरू युवा केंद्राकडून मुंबई ते गोवा पदयात्रा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी- नेहरू युवा केंद्राकडून 1 एप्रिल ते 31 मे 2023 या कालावधीत…
-
एनआरसी वसाहतीमधील कामगारांचा केडीएमसी कार्यालयावर धडक मोर्चा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - एनआरसी कॉलनी मधील…
-
केडीएमसी क्षेत्रात इंडियन स्वच्छता लिग अभियानाला सुरवात
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण / प्रतिनिधी - इंडियन स्वच्छता…
-
केडीएमसी प्रभाग रचनेबाबत भाजपचे सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप
डोंबिवली/संघर्ष गांगुर्डे - कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीवरून भाजप आणि शिवसेनेतील…
-
अन्यथा आगामी केडीएमसी निवडणुक स्वबळावर - जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - राज्यातील सत्तेमध्ये आम्ही सर्व…
- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; होळी व रंगपंचमीवर केडीएमसीकडून निर्बंध
कल्याण प्रतिनिधी - कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसन दिवस…
-
आता पुणे ते बँकॉक थेट विमानसेवा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय नागरी विमान…
-
केडीएमसी बाहेर आम आदमी पार्टीचे उपोषण
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली परिसरात आम…
-
उद्यापासून ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात
मुंबई/प्रतिनिधी - राज्यात उद्यापासून ( दि.१९ जून) ३० ते ४४…
-
केडीएमसी मुख्यालयावर एनआरसी कामगारांची धडक
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण जवळील मोहने येथे बंद…
-
दिव्यांगाबाबत जनजागृतीसाठी कल्याण ते गोवा सायकल प्रवास
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - अपघातात हातपाय गमवणाऱ्या किंवा जन्मापासूनच दिव्यांग असणाऱ्या…
-
आंबिवली टेकडीवर केडीएमसी आयुक्तांच्याहस्ते वृक्षारोपण
कल्याण/प्रतिनिधी - जैव विविधता उदयानाच्या माध्यमातून नागरिकांना निसर्गाच्या जवळ जाण्याची संधी…
-
केडीएमसी क्षेत्रात विशेष स्वच्छता सप्ताहाचा प्रारंभ
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महापालिकेच्या कायापालट अभियानात सामाजिक संस्था, नागरिकांनी सहभाग घेतल्यास…
-
७ ते १४ नोव्हेंबरदरम्यान विधि सेवा सप्ताहाचे आयोजन
मुंबई/प्रतिनिधी - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतभर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात…
-
केडीएमसी क्षेत्रातील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई सुरूच
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी…
-
राज्यात सर्व खाद्यतेल व तेलबियांवरील साठवणुकीवर निर्बंध नाहीत
मुंबई/प्रतिनिधी - केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जीवनावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत सर्व…
-
केडीएमसी कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
नेशन न्यूज मराठी टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवलीतील कंत्राटी सफाई…
-
केडीएमसी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त १८ हजार सानुग्रह अनुदान जाहीर
नेशन मराठी ऑनलाइन टिम. कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून…
-
उद्यापासून केडीएमसी क्षेत्रात बूस्टर डोस देण्यात येणार
नेशन न्युज मराठी टीम. कल्याण - दिनांक 10 जानेवारी 2022…
-
केडीएमसी खड्ड्याची महापालिका? माजी नगरसेवकाने स्वखर्चाने बुजवले खड्डे
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण शीळ रोड,मलंग रोड,पत्रिपुलासह मुख्य रस्त्यावर खड्ड्यामुळे…
-
केडीएमसी लवकरच सुरु करणार स्वतःची जलतपासणी प्रयोगशाळा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - दूषित पाण्यामुळे आपल्याला…
-
ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी अलर्ट मोड वर
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कोरोनाचा नवा व्हेरीयंट ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी यंत्रणेने…
-
कल्याण रनर्सच्या धावपटूंचा केडीएमसी आयुक्तांनी केला सत्कार
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - २८ ऑगस्ट रोजी…
-
रिझर्व बँकेचे येस बँकेवर आर्थिक निर्बंध खातेदाराच्या बँकेबाहेर रांगा
कल्याण -रिझर्व बँकने येस बँकेवर आर्थिक निर्बंध लादल्या नंतर कल्याण…
-
केडीएमसी मधील १३ नगरसेवकाचे नगरसेवक पद रद्द
प्रतिनिधी. कल्याण - डोंबिवली महापालिकेतील 27 गावांमधून वगळलेल्या 18 गावांची…
-
येत्या पावसाळ्यापूर्वी रिंगरोडचे काम पूर्ण होणार - केडीएमसी आयुक्त
प्रतिनिधी. कल्याण - कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडी फोडण्याच्या दृष्टीने महत्वाचा…
-
आता केडीएमसी शाळेतील विद्यार्थ्याना फुटबॉलचे धडे
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - 11 ऑक्टोबरपासून भारतात…
-
१० ते १५ जूनदरम्यान मान्सूनचे विदर्भात होणार आगमन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. अमरावती/प्रतिनिधी - उष्णतेच्या लाटेमुळे देशातील…
-
केडीएमसी क्षेत्रात आतापर्येंत ५ लाख ७८ हजार नागरिकांचे लसीकरण
कल्याण/प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यंत हेल्थ वर्कर, फ्रंन्ट…
-
केडीएमसी सार्वत्रिक निवडणूक, महिला आरक्षण सोडतीवर इच्छुकांच्या नजरा
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण -कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सन २०२२ मध्ये…
-
केडीएमसी प्रशासनाकडे कामगार संघटनांची २५ हजार बोनसची मागणी
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - कोवीड काळात केडीएमसी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेलं…
-
आता केडीएमसी क्षेत्रात फेरीवाले आणि हातगाड्यांना शनिवारी-रविवारी मनाई
कल्याण प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या 3 दिवसांपासून…
-
केडीएमसी लाचखोरी प्रकरण ७ प्रभाग अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या
कल्याण प्रतिनिधी- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 'क' प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्याला अनाधिकृत…
-
भारताचा स्वातंत्र्यलढा १७५७ ते १९४७ या कालावधीतील प्रदर्शनाचे आयोजन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - शिक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील…
-
केडीएमसी आयुक्तांनी हजेरी शेडला भेट देत कर्मचाऱ्यांची घेतली झाडाझडती
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - केडीएमसी आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी कल्याण…
-
मतदार जनजागृतीसाठी केडीएमसी कड़ून लोकशाहीच्या महोत्सवाचा शुभारंभ
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राज्यभर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021…