महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image पर्यावरण लोकप्रिय बातम्या

नवीमुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली, मोरबे धरण पूर्ण भरले

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी मुंबई / प्रतिनिधी – यावर्षी समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रतिदिन 450 द.ल.लि. क्षमतेचे मोरबे धरण संपूर्ण 100% भरले असून 88 मीटर ही जलसाठ्याची सर्वोच्च पातळी पार केल्याने आज 24 सप्टेंबर रोजी रात्री 1.30 वाजता सांडव्याचे दोन्ही दरवाजे 15 से.मी. उघडण्यात आलेले आहेत व‌ 675 क्युसेक इतका विसर्ग सांडव्यातून सुरु झाला आहे.

यावर्षी मोरबे धरण प्रकल्प क्षेत्रात आजतागायत 3540.00 मि.मि. पावसाची नोंद झाली असून सद्यस्थितीत 190.890 द.ल.घ.मी. पाणी साठा उपलब्ध होऊन मोरबे धरण पूर्ण भरल्याने नवी मुंबई जलसमृध्द झाली आहे. यावर्षी उत्तम पर्जन्यवृष्टीमुळे मोरबे धरण संपूर्ण क्षमतेने भरले असून गणेशोत्सवामध्ये नवी मुंबईकरांना मिळालेली ही मोठी भेट असल्याचे सांगत नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच आसपासच्या शहरांतील जलस्थिती लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचे महत्व लक्षात घेऊन पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
×