Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
पोलिस टाइम्स

शेतीच्या वादातून शेजाऱ्यानेच केली शेजरीणीची हत्या

प्रतिनिधी.

कल्याण – कल्याण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आपटी गावातील आपटीबारी मधील आदिवासी पाड्यात शेजाऱ्याने शेजारील महिलेची चाकुने भोसकून निर्घृण हत्या केल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. आपली पत्नीचा मृत्यू करणी झाल्याचा आरोपीला संशय होता त्यामुळे निर्घृण हत्याला अंधश्रद्धेची किनार असल्याचे प्रथमदर्शी दिसून येत आहे.          

कल्याण पश्चिमेतील खडकपाडा पोलीस स्टेशन च्या हद्दीत अटाळी गावात अंधश्रद्धेमुळे दोन निष्पाप लोकांची हत्या झाल्याची घटना ताजी असताना कल्याण ग्रामीण भागातील आपटीबारी परिसरात शेजारील महिलेने करणी  केल्याने पत्नीचा आठ दिवसांपूर्वी मृत्यू झाला .फक्त याचा संशय घेऊन गुलाबाबाई वाघे वय ४५वर्षे शेजारील नातेवाईक महिलेची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी ७वा.सुमारास घडली. दरम्यान तात्काळ घटनेची माहिती मिळताच     घटनास्थळी मंगळवारी रात्री उप वि पो आधि दिलीप गोडबोले,पो नि बालजी पांढरे यांनी भेट दिली.    

या प्रकरणी कल्याण ग्रामीण तालुका  पोलिसांनी  भा.द.वि. ३०२ नुसार गुन्हा दाखल करीत बुधवारी आरोपी मोहन वाघे वय २८वर्षे याला अटक केली आहे मात्र या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तपास आधिकारी स.पो.निरी संतोष दराडे यांच्याशी संपर्क साधला असता  आरोपी मोहन वाघे याला अटक केली असुन कोर्टात हजर केले असता ४ दिवसाची पी सी. दिली असुन तपासादरम्यान आरोपीने मयत गुलाबबाई ही त्यांच्या जमिनीत शिरकाव करत असल्याने या वादातुन हत्या केली असल्याचे सांगितले. “या हत्याला अंधश्रद्धेची किनार असल्याचे परिसरातील नागरिक बोलत आहे मात्र पोलिसांनी अनेक बाजूने तपास करीत असून सत्यता लवकरच समोर येणार असल्याचे बोलले जात आहे.

Translate »
X