नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी- नेहरू युवा केंद्राकडून 1 एप्रिल ते 31 मे 2023 या कालावधीत देशभरातील सर्व जिल्ह्यामध्ये समुदाय आधारित संस्थांमार्फत युवा संवाद भारत @ 2047 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या माध्यमातून ‘कॅच द रेन’ आणि ‘मेरी मिट्टी, मेरा देश’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या संकल्पनांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून मुंबई ते गोवा दरम्यान पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई ते गोवा 536 कि.मी अंतराच्या पदयात्रेत 11 दिव्यांग युवक सहभागी झाले आहेत. आज सकाळी बोरीवली येथून पदयात्रेला सुरुवात झाली. 21 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता गोवा युथ हॉस्टेल येथे यात्रा संपन्न होईल.