महत्वाच्या बातम्या

मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना   भारत एनसीएपी- नवीन कार मूल्यांकन कार्यक्रमाचा शुभारंभ    ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा   मुंबई-आयएनएस मुरगाव क्षेपणास्त्र विनाशिका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट   आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस गोव्यात साजरा   लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख नेपाळ भेटीवर
Default Image राजकीय

मोदींच्या उज्वला गॅस योजनेच्या बॅनरखालीच राष्ट्रवादीचे इंधन दर वाढी विरोधात आंदोलन

भिवंडी प्रतिनिधी  केंद्र शासनाने घरगुती गॅस सह पेट्रोल , डिझेलच्या इंधन दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केल्याने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली असल्याने केंद्र शासनाच्या या इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीच्या वतीने भिवंडीतील वंजारपट्टी नाका येथे रविवारी आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या उज्वला गॅस योजनेच्या माहितीसंदर्भातील वंजारपट्टी नाका येथील एका पेट्रोल पंपाच्या बाजूला लावलेल्या मोदींच्या जाहिरातीखालीच राष्ट्रवादीच्या महिला शहाराध्यक्षा स्वाती कांबळे व कार्यकर्ते जावेद फारुकी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर गॅस दर वाढीचा निषेध म्हणून रिकाम्या गॅस बाटला तिरडीवर ठेवून प्रतिकात्मक प्रेत यात्रा देखील काढण्यात आली होती. त्याचबरोबर इंधन दर वाढीचा निषेध म्हणून हातगाडीवर मोटार सायकल तसेच चूल ठेऊन राष्ट्रवादीच्या वतीने केंद्र शासनाच्या इंधन दर वाढीचा निषेध केला.  

केंद्र सरकार देशातील सामान्य जनतेची फसवणूक करत असून वेळोवेळी इंधन दरवाढ करत असून सामन्यांचे कंबरडे मोडीत आहे. केंद्र सरकारच्या फसव्या धोरणांचा व इंधन दर वाढीचा निषेध म्हणून आज हे आंदोलन मोदींच्या बॅनरबाजीखालीच केले असून देशातील जनतेच्या माथी मारलेली इंधन दरवाढ कमी केली नाही तर याहून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा स्वाती कांबळे यांनी दिली आहे. 

Translate »
×