नेशन न्यूज मराठी टीम.
ठाणे / प्रतिनिधी – २०२४ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीच्या धर्तीवर देशभर राजकीय वातावरणाचे रंग दिसू लागले आहेत. उत्तर सभा घेतल्या जात आहेत. एकमेकावर शाब्दिक चिखलफेक करत बेताल वक्तव्य केली जात आहेत. आपल्या राजकीय नेत्यावर अशी टीका झाल्यास कार्यकर्ते त्याचा निषेध व्यक्त करताना दिसून येतात. बीड येथे झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार छगन भुजबळ यांनी राष्ट्र वादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल असेच काहीसे वक्तव्य केले. ह्याचे पडसाद पण दिसू लागले आहेत.
बीड येथील सभेत राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार छगन भुजबळ यांनी राष्ट्र वादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याचा ठाण्यात निषेध करण्यात आला. ठाण्यातील पाच पखाडी येथील कार्यालय बाहेर आमदार जितेंद्र आव्हाड समर्थकांनी भुजबळ यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करत निषेध केला आहे.