नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई – भारतीय नौदलाची स्वदेशी बनावटीची मार्गदर्शित -क्षेपणास्त्र स्टेल्थ विनाशिका, आयएनएस कोलकाता, बुधवारी (25 मे, 2022) मुंबईत नेव्हल डॉकयार्ड येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात, भारतीय लष्कराच्या सर्वात मानाच्या पायदळ रेजिमेंटपैकी एक असलेल्या महार रेजिमेंटशी संलग्न झालीकॅप्टन प्रशांत हांडू, एनएम, कमांडिंग ऑफिसर, कोलकाता यांनी महार रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर नवनीत जर्याल यांना जहाजाचे मानचिन्ह सुपूर्द केले
लेफ्टनंट जनरल सी बन्सी पोनप्पा, एव्हीएसएम, व्हीएसएम, भारतीय लष्कराचे ॲडज्युटंट जनरल आणि महार रेजिमेंटचे कर्नल, रिअर ॲडमिरल समीर सक्सेना, एनएम, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग, वेस्टर्न फ्लीट, ब्रिगेडियर नवनीत जर्याल, कमांडंट, ब्रिगेडियर नवनीत जर्याल महार रेजिमेंटल सेंटर, आणि कॅप्टन प्रशांत हांडू, एनएम, कमांडिंग ऑफिसर, कोलकाता, यांनी संलग्नता सनदीवर स्वाक्षऱ्या केल्या आणि जहाजावर हा संलग्नता सोहळा पार पडला.
लेफ्टनंट जनरल सी बन्सी पोनप्पा, एव्हीएसएम, व्हीएसएम, भारतीय लष्कराचे ॲडज्युटंट जनरल आणि महार रेजिमेंटचे कर्नल आणि रिअर ॲडमिरल समीर सक्सेना, एनएम, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग, वेस्टर्न फ्लीट यांनी , ब्रिगेडियर नवनीत जर्याल, कमांडंट महार रेजिमेंटल सेंटर, आणि कॅप्टन प्रशांत हांडू, एनएम, कमांडिंग ऑफिसर, कोलकाता यांच्या उपस्थितीत संलग्नता सनदेचे आदानप्रदान केले .लेफ्टनंट जनरल सी बन्सी पोनप्पा, एव्हीएसएम, व्हीएसएम, भारतीय लष्कराचे ॲड ज्युटंट जनरल आणि महार रेजिमेंटचे कर्नल यांनी नौदल डॉकयार्डमधील गौरव स्तंभ येथे शूरवीरांना आदरांजली वाहिली आणि अभ्यागत नोंदवहीत स्वाक्षरी केली.
लेफ्टनंट जनरल सी बन्सी पोनप्पा, एव्हीएसएम, व्हीएसएम, भारतीय लष्कराचे ॲडज्युटंट जनरल आणि महार रेजिमेंटचे कर्नल आणि रिअर ॲडमिरल समीर सक्सेना, एनएम, फ्लॅग ऑफिसर कमांडिंग, वेस्टर्न फ्लीट ,यांनी ब्रिगेडियर नवनीत जर्याल, कमांडंट महार रेजिमेंटल सेंटर, आणि कॅप्टन प्रशांत हांडू, एनएम, कमांडिंग ऑफिसर, कोलकाता यांच्या उपस्थितीत संलग्नता सनदेचे आदानप्रदान केले
या सोहळ्यात नौदल आणि महार रेजिमेंटच्या बँड तुकड्यांनी संयुक्त संचलन आणि संयुक्त सादरीकरण केले.योगायोगाने, कोलकात्याचे ब्रीदवाक्य “युद्धाय सर्वसनध” (युद्धासाठी नेहमी तयार) आणि महार रेजिमेंटचे ब्रीदवाक्य “यश सिद्धी” (यश आणि प्राप्ती) एकमेकांना पूरक आणि साजेशी आहेत.