नेशन न्यूज मराठी टिम.
नवी दिल्ली/प्रतिनिधी– भारतीय नौदल आणि रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही (RAN) यांच्यातील 5 वा द्विवार्षिक AUSINDEX सागरी सराव, 22-25 ऑगस्ट 2023 दरम्यान ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे आयोजित करण्यात आला होता. आयएनएस सह्याद्री आणि आयएनएस कोलकाता यांनी RAN मधील HMAS चौले आणि HMAS ब्रिस्बेनसह सरावात भाग घेतला. जहाजे आणि त्यांचे अंतर्भूत हेलिकॉप्टर तसेच लढाऊ विमाने आणि सागरी गस्ती विमानेही या सरावात सहभाग झाली.
4 दिवसांच्या सराव काळात, AUSINDEX च्या सागरी कार्यान्वयनाच्या तिन्ही क्षेत्रांमध्ये समन्वित सरावाची मालिका समाविष्ट होती. सामान्य कार्यपद्धतींचे पुनर्प्रमाणीकरण करून आणि भारतीय नौदल आणि RAN यांच्यातील घनिष्ठ संबंध आणि आंतरकार्यक्षमतेची पुष्टी करून हा सराव उत्साहात संपन्न झाला.