नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण /संघर्ष गांगुर्डे– महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांडगे यांनी दिलेल्या निर्देशानुसार शिक्षण विभागाचे उपायुक्त स्वाती देशपांडे यांचे अधिपत्याखाली नाली कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रांमध्ये “नवभारत साक्षरता अभियान उपक्रम २०२२ -२७ अंतर्गत निरक्षरांचे सर्वेक्षण करण्याचे काम दि. १७.०८.२०१३ ते ३१.०८.२०२३ या कालावधीत महापालिका क्षेत्रातील ४४६ शाळांतील २३०६ शिक्षकांमार्फत सर्व वार्डातील सर्व कुटूंबाचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
या सर्वेक्षणद्वारे निरक्षरांचे नाव, लिंग, संवर्गनिहाय माहिती संकलीत करण्यात येणार आहे. सर्व वाडवि सर्वेक्षण करून निरक्षरांची संख्या निश्चित करून त्यांना ऑनलाईन व ऑफलाईन पदधतीने साक्षर करणे हा मुख्य उद्देश आहे.
निरक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण दि. १७.०८. २०२३ ते ३१.०८.२०२३ या कालावधीत शिक्षक सर्वेक्षक, म्हणून आपल्या कुटुबांचे सर्वेक्षण करून निरक्षरांची संख्या निश्चित करणार आहे.
या कालावधित वय वर्ष १५ ते ३५ आणि ३५ वर्षाच्या पुढील सर्व स्त्री आणि पुरूष दिव्यांग आणि पारलिंगी यांचे सर्वेक्षण करून विगतवारी करून निरक्षर संख्या निश्चित करावयाची आहे. तसेच शाळाबाहय मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करावयाचे आहे..
या सर्वेक्षण उपक्रम अंतर्गत जिल्हास्तर, तालुकास्तर, सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, सिआरसी प्रमुख यांना ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात आले आहे.
आपल्या घरी सर्वेक्षणासाठी येणा-या सर्वेक्षक ( शिक्षक ) यांना सहकार्य करून आपल्या कुटुंबाची माहिती सांगण्यात यावी जेणेकरून या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश साध्य करण्यासाठी उपाययोजना करून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्र शाळाबाहय व निरक्षर मुक्त करण्यासाठी प्रशासन अधिकारी रंजना राव यांनी सहकार्य करणेकामी महापालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे.