नेशन न्यूज मराठी टीम.
कल्याण / प्रतिनिधी – देशभर विविध आंदोलनाद्वारे सरकार कडे मागण्यांचे निवेदन दिले जाते. सध्या दिल्ली येथे होवू घातलेल्या आंदोलनात कल्याण डोंबिवली येथील अल्प बचत एजंटस् पाठिंबा असणार आहे. विविध मागण्यांसाठी 2 ऑक्टोबरपासून दिल्लीत सुरू असलेल्या राष्ट्रव्यापी आंदोलनाला कल्याण डोंबिवलीतील 500 अल्प बचत एजंटस् नीही उत्स्फूर्त पाठिंबा दर्शवला आहे. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कल्याण पश्चिमेच्या सर्वात जुन्या अशा टिळक चौक पोस्ट ऑफिस कार्यालयाबाहेर अनेक एजंट सहभागी झाले होते.
नॅशनल स्मॉल सेव्हींग एजंट संघटने (NSSAAI) तर्फे गेल्या 4 दिवसांपासून दिल्लीतील जंतर मंतर परिसरात आंदोलन सुरु आहे. या संघटनेचे देशभरात तब्बल 5 लाखाच्या आसपास सदस्य असून हे सर्व जण आपापल्या पद्धतीने गेल्या 4 दिवसांपासून या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
त्यांच्या प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहे. 1 डिसेंबर 2011 पासून पूर्वलक्षी प्रभावाने कमिशन पुन्हा सुरू केले जावे, मुख्य महिला एजंटस् ना 5 टक्के कमिशन देण्यात यावे, एजंसी नूतनीकरणासाठी दर तीन वर्षांनी होणारी पोलीस पडताळणी बंद करावी, 40 वर्षे जुनी व्यवस्था बंद करून पेपरलेस योजना लागू करावी, पी एल आय, सुकन्या समृध्दी, ज्येष्ठ नागरिक , महिला सन्मान योजनाही एजंटच्या माध्यमातून राबवाव्यात, महिला एजंटना डी ओ पी पोर्टलच्या माध्यमातून आर डी जमा करण्याची सुविधा प्रदान करावी, तात्काळ नव्या समितीचे गठन करून संघटनेच्या प्रतिनिधींचाही समावेश करावा,
लाईफ टाईम काळासाठी एजंसीचे नूतनीकरण व्हावे, प्रत्येक पोस्ट ऑफिसमध्ये एजंटच्या कामासाठी जागा निश्चित करावी, संदेशवाहक बनण्यावर लागलेले एजंटवर लादलेले निर्बंध मागे घ्यावेत, क्षेत्रीय भाषेत सर्क्युलर काढण्यात येऊन राष्ट्रीय एजंट संघटनेला प्रत पाठवावी, प्रत्येक पोस्ट ऑफिसमध्ये काम करण्याचे वेळापत्रक निश्चित करावे, प्रत्येक एजंटला वित्त मंत्रालयाकडून ओळखपत्र उपलब्ध करून द्यावे, पोस्टल पेमेंट बँकेला एजंटच्या माध्यमातून जोडण्यात यावे,
दिल्ली, महाराष्ट्र आणि केरळमध्ये तत्काळ नविन एजन्सी देण्यास सुरुवात करावी, स्वातंत्र्य दिनाला एजंटला अल्प बचत योजनांची शोभायात्रा करण्यास परवानगी द्यावी, 20 वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत आणि 60 वर्षांवरील एजंटना पेन्शन योजना लागू करावी, देशाच्या कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये काम करून कमिशन मिळवण्यासाठी एजंटला परवानगी द्यावी,पोस्टाच्या सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना एजंसी देण्याला प्रतिबंध करावा, ज्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल.
या प्रमुख मागण्यांसाठी 2 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर या दरम्यान देशातील एजंटस् ची निदर्शने करण्यात येत असल्याची माहिती कल्याणातील महिला एजंट मंजिरी गद्रे यांनी दिली.