नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त यंदाचा राज्यस्तरीय ‘राष्ट्रीय मतदार दिन’ महाराष्ट्रातील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, चर्चगेट आणि जिल्हा निवडणूक कार्यालय, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात येणार आहे.
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ, चर्चगेट, मुंबई येथे होणाऱ्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लेखक मिलिंद बोकील, अभिनेता गौरव मोरे, निवडणूक दूत सोनाली नवांगुळ, श्रीगौरी सावंत, झैनब पटेल, सान्वी जेठवाणी, प्रणित हाटे, कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर आणि मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रीय मतदार दिनाच्या या सोहळ्याचा शुभारंभ विद्यार्थ्यांच्या लोकशाही दिंडीने होणार आहे. तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, नवमतदारांना मतदार ओळखपत्र वाटप, मतदान निष्ठेची शपथ ग्रहण, मतदार जागृतीसंबंधी केलेल्या उपक्रमांच्या पुस्तिकेचे प्रकाशन, इत्यादी कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत.
या कार्यक्रमात महाराष्ट्रात मतदार नोंदणी आणि मतदार जागृती यासंबंधी उत्कृष्ट कार्य केलेले जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी, सामाजिक संस्था, पत्रकार आणि समाजमाध्यमांवर उत्तम कार्य केलेले निवडणूक कार्यालय यांना पुरस्कार दिले जाणार आहेत. तसेच, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने आयोजित केलेल्या ‘माझा गणेशोत्सव – माझा मताधिकार’, ‘लोकगीतांतून लोकशाहीचा जागर’ या राज्यस्तरीय स्पर्धांतील विजेत्यांनाही पुरस्कार दिले जातील. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या विद्यापीठस्तरीय रांगोळी आणि भित्तीपत्रक या स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके दिली जातील.
राष्ट्रीय मतदार दिनाच्या या कार्यक्रमात विद्यापीठ परिसरात मतदार जागृती दालन उभारण्यात येणार असून सापशिडी, लुडो यांसारख्या खेळांतून विद्यार्थ्यांना मतदान, निवडणूक यासंबंधी प्रक्रिया समजावून सांगितली जाईल. अभिरूप मतदान केंद्राचे दालन, निवडणुकीसंबंधी प्रदर्शन आणि विविध आकर्षक साहित्यांनी सुशोभित लोकशाही भिंत इथे उभारण्यात येणार आहे. तसेच, नागरिकांनी मतदान करणे का आवश्यक आहे, यासंबंधीचे पथनाट्य सादरीकरणही होईल.
२५ जानेवारी १९५० रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. आयोगाचा हा स्थापना दिवस २०२१ पासून संपूर्ण देशभरात ‘राष्ट्रीय मतदार दिन’ म्हणून साजरा केला जातो. देशातील मतदारांना समर्पित करण्यात आलेल्या या दिवशी मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा म्हणून विविध उपक्रम आयोजित केले जातात. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हा, तालुका आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पातळीवरही विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.
Related Posts
-
राष्ट्रीय मतदार दिनी ई-मतदार ओळखपत्र वाटपाचा प्रारंभ
मुंबई, दि.23: राष्ट्रीय मतदार दिनाच्या निमित्ताने येत्या सोमवार दि. 25…
-
पहिल्या राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेस मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारत निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच…
-
पहिली राष्ट्रीय मतदार स्पर्धा, जिंका रोख पारितोषिके
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सामूहिक सहभागातून लोकशाहीतील प्रत्येक…
-
दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांनी दिली भेट
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी -2022 च्या राष्ट्रीय क्रीडा…
-
छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
नेशन न्युज मराठी टीम. ठाणे - भारत निवडणूक आयोगाने दि.…
-
मतदार नोंदणीसाठी ५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
मुंबई/प्रतिनिधी - भारत निवडणूक आयोगातर्फे राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण…
-
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त रॅलीच्या माध्यमातून जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पंढरपूर/प्रतिनिधी - डेंग्यू हा डासांमुळे…
-
१३ ऑगस्टला ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत
नेशन यूज मराठी टिम. ठाणे - ठाणे येथील जिल्हा सेवा…
-
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली/प्रतिनिधी - वर्ष 2021 साठीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मंगळवारी …
-
राष्ट्रीय महामार्गावरच्या टोल प्लाझासाठी मासिक पास
नेशन न्युज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली- राष्ट्रीय महामार्गा वापरकर्ता शुल्क…
-
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे चैत्यभूमीवर मतदार जागृती दालन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
-
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी ऑनलाईन नावनोंदणी करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना प्रातिनिधिक स्वरूपात…
-
राष्ट्रीय औष्णिक उर्जा आयोगाकडून जैवविविधता धोरण जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - राष्ट्रीय औष्णिक उर्जा…
-
राष्ट्रीय योगा स्पर्धेसाठी तीन खेळाडूची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - पुणे येथे नुकत्याच झालेल्या…
-
'राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार' गौरव सोहळा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - विद्यार्थ्यांमध्ये…
-
लोकशाही मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी लोकशाही भोंडला स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - निसर्गाच्या सर्जनशीलतेचा आणि निर्मितीशील स्त्रीशक्तीचा उत्सव म्हणजे नवरात्र,…
-
महानगरपालिका पोटनिवडणुकांसाठी १२ नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या
मुंबई/प्रतिनिधी - विविध सहा महानगरपालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 12 नोव्हेंबर 2021 रोजी…
-
भारतीय रेल्वेला नऊ राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी देल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु…
-
दिव्यांग सक्षमीकरणात राज्याला सात राष्ट्रीय पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्र राज्याने…
-
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. कोल्हापूर- कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या…
-
तृतीयपंथीय व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्रासाठी राष्ट्रीय पोर्टल सुरु
मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून तृतीयपंथीय…
-
कल्याणात तृतीय पंथीयांच्या मतदार नोंदणीला उत्फुर्त प्रतिसाद
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या…
-
नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नांदेड/प्रतिनिधी- मार्च 2023 मध्ये वादळी…
-
कल्याणच्या ऋतुजाने राष्ट्रीय रोलर स्केटींग स्पर्धेत पटकविले कांस्यपदक
कल्याण प्रतिनिधी - रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने मोहाली…
-
महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्यांची २३ जूनला प्रसिद्धी
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-…
-
राष्ट्रीय लॉजिस्टिक पोर्टल- मरीनचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि…
-
राष्ट्रीय आपत्तीनिधीतून महाराष्ट्राला ३५५ कोटींचा निधी मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - महाराष्ट्रात आलेल्या पूर…
-
कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार
प्रतिनिधी. मुंबई - स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र सरकारच्या पेयजल…
-
महाराष्ट्रातल्या दोन शोर्यवीर बालकांना राष्ट्रीय वीरता पुरस्कार
नेशन न्युज मराठी टीम महाराष्ट्राच्या दोन बालकांना राष्ट्रीय वीरता पुरस्काराने…
-
मतदार जनजागृतीसाठी केडीएमसी कड़ून लोकशाहीच्या महोत्सवाचा शुभारंभ
कल्याण/संघर्ष गांगुर्डे - राज्यभर 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021…
-
अमरावतीत कृषी कायद्या विरोधात राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन
प्रतिनिधी. अमरावती - सातबारा वाचवण्यासाठी आठ बाराचा बंद यशस्वी करा…
-
सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कारासाठी नामांकने पाठविण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - देशाची एकता व अखंडता राखण्यासाठी निस्वार्थ भावनेने अथक…
-
राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याची २६ जून अंतिम मुदत
प्रतिनिधी . सांगली - केंद्र शासनामार्फत सन 2017-18 व सन…
-
महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२१…
-
विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी शाळेकडून आर्थिक मदतीचे आवाहन
कल्याण/प्रतिनिधी - कोरोनामुळे अनेक पालकांचे रोजगार गेल्याने परिणामी त्यांच्या मुलांच्या…
-
प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन
नेशन न्युज मराठी टीम. मुंबई- महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून…
-
प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची शासकीय…
-
राष्ट्रीय माध्यम पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई- मतदार शिक्षण व मतदान जनजागृती विषयात सन 2020…
-
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन
नेशन न्यूज़ मराठी ऑनलाइन टिम. नागपूर/प्रतिनिधी - कृत्रिम बुध्दिमत्ता व इतर…
-
भविष्यात लोकशाही टिकणार की नाही ? बाळासाहेब थोरात यांचा सवाल
नेशन न्यूज मराठी टीम. अहमदनगर/प्रतिनिधी - लोकशाहीचे संपादक कमलेश सुतार…
-
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात महात्मा गांधींच्या दुर्मिळ चित्रफितीचे प्रक्षेपण
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी -पुणे येथील राष्ट्रीय चित्रपट विकास…
-
कोकण पदवीधर मतदारसंघ अंतिम मतदार याद्या ३० डिसेंबर प्रसिद्ध होणार
नेशन न्यूज मराठी टिम. https://youtu.be/Gm2AMnjXa2A?si=DeUs0OoEaLMrYpY3 कल्याण/प्रतिनिधी - १ नोव्हेंबर, २०२३…
-
मतदार जनजागृतीसाठी ‘अभिव्यक्ती मताची’ स्पर्धेस ५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे / प्रतिनिधी - देशाचे भावी…
-
मतदार नोंदणीबाबत प्रश्नांची उत्तरे आता ‘चॅटबॉट’द्वारे एका क्लिकवर
मुंबई/प्रतिनिधी - राज्य निवडणूक आयोग आणि गपशप संस्थेने ‘महाव्होटर चॅटबॉट’द्वारे…
-
राष्ट्रीय पोलीस अश्वारोहण स्पर्धेत हर्ष पोद्दार यांना सुवर्णपदक
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती - अखिल भारतीय पोलीस अश्वारोहण स्पर्धेत…