प्रतिनिधी.
नवी दिल्ली – महाराष्ट्रातून मुंबई येथील दोन स्टार्टअपनी सर्वोत्तम कामगिरी करत मानाचा ‘राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार’ पटकाविला आहे.
आरोग्य सेवा श्रेणीमध्ये ‘वेल्दी थेरपेटिक्स प्रायव्हेट लिमीटेड’ आणि नागरी सेवा श्रेणीमध्ये ‘तरलटेक सोल्युशन प्रायव्हेट लिमीटेड’ला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाच्या वतीने येथील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात आज ‘राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार-२०२०’चा निकाल जाहीर झाला. केंद्रीय वाणिज्य व उद्योग तथा रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि विभागाचे सहसचिव अनिल अग्रवाल यावेळी उपस्थित होते तर केंद्रीय वाणिज्य व उद्योग विभागाचे राज्यमंत्री सोम प्रकाश हे दूरदृष्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले.
देशामध्ये रोजगाराला चालना देण्यासाठी व नवसंकल्पना प्रत्यक्षात उतरवून नाविन्यपूर्ण उत्पादने व पयार्यी सेवा व्यवस्था निर्माण व्हावी या उद्देशाने ‘राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार’ सुरु करण्यात आला आहे. एकूण १२ श्रेणींमध्ये विविध ३५ गटात या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील दोन स्टार्टअपचा यात समावेश आहे.
‘वेल्दी थेरपेटिक्स’ ला आरोग्य सेवांमधील सर्वोत्तम स्टार्टअपचा पुरस्कार
आरोग्य सेवा श्रेणीमध्ये एकूण चार गटात पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशभरातील २१ राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमधून एकूण २४९ स्टार्टअपमध्ये या पुरस्कारासाठी स्पर्धा होती. यामधून आरोग्य सेवा पुरविण्याच्या गटात मुंबई येथील ‘वेल्दी थेरपेटिक्स प्रायव्हेट लिमीटेड’ ला सर्वोत्तम स्टार्टअपचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या संस्थेने रूग्णांसाठी ‘मॉनिटरींग डॅश बोर्ड’ तयार केले असून या माध्यमातून रूग्णांना सतर्कता संदेश पुरविण्यात येतात. डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली कार्यरत या सुविधेच्या माध्यमातून रूग्णांना गुणात्मक सेवा उपलब्ध झाली आहे.
‘तरलटेक सोल्युशन्स’ ला नागरी सेवांमधील सर्वोत्तम स्टार्टअपचा मान
नागरी सेवा श्रेणीमध्येही एकूण चार गटात पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशभरातून सहभागी एकूण १३७ स्टार्टअपमध्ये या पुरस्कारासाठी चुरस होती. यामधून ‘जल व जल जाळे निर्माण करण्याच्या’ गटात मुंबई येथील ‘तरलटेक सोल्युशन प्रायव्हेट लिमीटेड’ ला सर्वोत्तम स्टार्टअपचा पुरस्कार जाहीर झाला आहे. अन्य साधनांअभावी हात पंपावर अवलंबून असणा-या लोकांसाठी या संस्थेने हात पंप विकसीत करून स्वच्छ पाणी पुरवठा करण्यात नाविन्यपूर्ण कार्य केले आहे.
५ लाख रूपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप असून विजेत्या स्टार्टअपला आपल्या प्रकल्पाबाबत कामाची मागणी नोंदविण्यासाठी संबंधित सार्वजनिक प्राधिकृत अधिकारी, कॉर्पोरेट संस्थांपूढे कामाचे सादरीकरण करण्याची संधी मिळणार आहे.
Related Posts
-
भारतीय रेल्वेला नऊ राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी देल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु…
-
राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कारसाठी अर्ज करण्यासाठी ३१मे पर्येंत मुदत
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - नवोन्मेषी उत्पादने तयार…
-
मराठी चित्रपट व कलाकारांना विविध श्रेणीत राष्ट्रीय पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - ‘गोष्ट एका पैठणीची’…
-
कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार
प्रतिनिधी. मुंबई - स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र सरकारच्या पेयजल…
-
महाराष्ट्रातील तीन परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - आरोग्य क्षेत्राचा कणा…
-
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२२ ची घोषणा
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी -युवा व्यवहार आणि क्रीडा…
-
राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलचा प्रारंभ, विविध पुरस्कारांसाठी नामांकन खुले
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - पारदर्शकता आणि जन…
-
राष्ट्रीय पेसापालो स्पर्धेत १४ राज्यातील ३३ संघांचा समावेश
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण - १२ वी राष्ट्रीय पेसापालो…
-
दिव्यांग सक्षमीकरणासाठी वर्ष २१ -२२ साठी महाराष्ट्राला एकूण सात राष्ट्रीय पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - दिव्यांगांनी, राज्य शासनाने तसेच…
-
राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल सुरू, विविध पुरस्कारांसाठी नामांकन खुले
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारत सरकारच्या विविध…
-
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेस उर्जा संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाकडून दोन पुरस्कार जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - महाराष्ट्र उर्जा विकास…
-
सव्वा दोन कोटीच्या सोन्यासह दोन तस्करांना अटक
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज…
-
अधिकारी भाग्यश्री बानायत यांना प्रतिष्ठेच्या ‘स्कॉच’ राष्ट्रीय पुरस्कार
शिर्डी/प्रतिनिधी - शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत…
-
महाराष्ट्राला खनिज क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी राष्ट्रीय खनिज विकास पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली- खनिज क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी…
-
महाराष्ट्राला १२ पद्म पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - देशातील सर्वोच्च नागरी…
-
महाराष्ट्रातील तीन छायाचित्रकारांना राष्ट्रीय छायाचित्रण पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - उत्कृष्ट छायाचित्रणासाठी राज्यातील…
-
नव्या शैक्षणिक धोरणाविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलनचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन
कल्याण /संघर्ष गांगुर्डे - नव्या शैक्षणिक धोरणाविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या वतीने…
-
बालशक्ती पुरस्कार व बालकल्याण पुरस्कार साठी १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत देण्यात…
-
महाराष्ट्रातील दोन बंदरांना ‘सागर श्रेष्ठ सन्मान’ पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील मुंबई बंदर प्राधिकरण,…
-
सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार बार्डो मराठी चित्रपटाला
दिल्ली/प्रतिनिधी - ‘बार्डो’ या मराठी चित्रपटाला 67 वा राष्ट्रीय चित्रपट…
-
राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरामध्ये वाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - राज्यातील पीयूसी चाचणीच्या दरांमध्ये…
-
इलेक्ट्रीक वाहन वापराच्या सुविधेसाठी महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/संघर्ष गांगुर्डे - इलेक्ट्रिक वाहनधारकांची गाड्यांच्या…
-
राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार-२०२३ साठी आवाहन
नेशन न्यूज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालन मंत्रालयाच्यावतीने…
-
सांस्कृतिक पुरस्कार आणि मानधन योजनेचे नामकरण
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या…
-
कल्याण डोंबिवली शहराने पटकावले ७ राष्ट्रीय पुरस्कार
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. कल्याण/प्रतिनिधी - भारत सरकार गृहनिर्माण…
-
राष्ट्रीय लोक अदालतीत राज्यातील १२ लक्ष ४५ हजार प्रकरणांचा निपटारा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. मुंबई/प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य विधी सेवा…
-
जवानांसाठी दोन लाख राख्या केल्या रवाना
नेशन न्यूज मराठी टीम. नागपूर / प्रतिनिधी - देशाच्या रक्षणासाठी…
-
महाराष्ट्रातल्या दोन शोर्यवीर बालकांना राष्ट्रीय वीरता पुरस्कार
नेशन न्युज मराठी टीम महाराष्ट्राच्या दोन बालकांना राष्ट्रीय वीरता पुरस्काराने…
-
महाराष्ट्रातील दोन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली/प्रतिनिधी - मनोज गुंजाळआणि सपना बाबर या महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना उल्लेखनीय योगदानासाठी…
-
राष्ट्रीय जल पुरस्कार २०२० करिता १० फेब्रुवारी २०२१ पर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई - जलसंसाधन, नदीविकास आणि गंगा पुनरुज्जीवन, मंत्रालय, भारत…
-
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त रॅलीच्या माध्यमातून जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पंढरपूर/प्रतिनिधी - डेंग्यू हा डासांमुळे…
-
महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२१…
-
महावितरणला छतांवरील सौरऊर्जा निर्मितीसाठी राष्ट्रीय पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - मुंबई दि. २४ फेब्रुवारी २०२३…
-
महाराष्ट्रातील ५ ग्रामपंचायतींचा राष्ट्रीय पंचायत पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - सर्वसमावेशक विकास करणाऱ्या…
-
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार व अन्य क्रीडा पुरस्कार सुधारित नियमावलीसाठी सूचना,अभिप्राय २२ जानेवारी पर्यंत पाठवावेत
प्रतिनिधी. रायगड - शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रतीवर्षी शिवछत्रपती जीवन…
-
महाराष्ट्रातील दोन शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन गौरव
नवी दिल्ली/प्रतिनिधी - गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक खुर्शिद शेख आणि उस्मानाबाद…
-
महाराष्ट्रातील तीन हस्त शिल्पकारांना राष्ट्रीय शिल्प पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील तीन हस्त…
-
महाराष्ट्राच्या चार बालकांची ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२२’ साठी निवड
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - महाराष्ट्राचे प्रतिभावंत बालक…
-
दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांनी दिली भेट
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी -2022 च्या राष्ट्रीय क्रीडा…
-
राष्ट्रीय खनिज विकास प्राधिकरणाने जिंकला 'इंडस्ट्री एक्सलन्स २०२२ पुरस्कार'
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रीय खाण कामगार…
-
राष्ट्रीय क्रीडा व साहसी पुरस्कार प्रदान,महाराष्ट्रातील ११ खेळाडू व ३ संस्थांचा समावेश
नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय युवा कल्याण तथा क्रीडा मंत्री अनुराग…
-
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली/प्रतिनिधी - वर्ष 2021 साठीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मंगळवारी …
-
महाराष्ट्राला स्वच्छ सर्वेक्षणाचे सर्वाधिक राष्ट्रीय पुरस्कार
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्राला सर्वाधिक स्वच्छ सर्वेक्षण वर्ष 2021 चे राष्ट्रीय…
-
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ६९ वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - नवी दिल्लीत आयोजित…
-
'राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार' गौरव सोहळा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - विद्यार्थ्यांमध्ये…
-
महाराष्ट्रातील एक कार्यक्रम अधिकारी आणि दोन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली /प्रतिनिधी - महाराष्ट्रातील कार्यक्रम अधिकारी …
-
दिव्यांग सक्षमीकरणात राज्याला सात राष्ट्रीय पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्र राज्याने…
-
बार्डो चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर
दिल्ली प्रतिनिधी - 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा आज…
-
महाराष्ट्रातील दोन प्रशिक्षक आणि चार खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रदान
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट…