नेशन न्युज मराठी टिम.
ठाणे/प्रतिनिधी – शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना 1961 अंतर्गत मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राद्वारे अंबरनाथ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 12 डिसेंबर 2022 रोजी प्रधानमंत्री अप्रेंटिस मेळा अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात इयत्ता आठवी ते आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार एम.एस.जाधव यांनी केले आहे.
अंबरनाथ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सकाळी 10.00 ते सायं. 5.00 या वेळेत हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजने अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील मेळाव्याकरीता औ.प्र. संस्था, औद्योगिक आस्थापना तसेच इ. 8 वी. इ. 10 वी. इ. 12 वी. उत्तीर्ण किंवा उच्च स्तर आय. टी. आय. उत्तीर्ण उमेदवारांनी अंबरनाथ येथील मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र द्वारा औद्योगिक प्रशिक्षण संस्था या संस्थेत उपस्थित रहावे, असे आवाहन सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार एम.एस.जाधव यांनी केले आहे.