नेशन न्यूज मराठी टीम.
मुंबई/प्रतिनिधी – राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या मुंबईमध्ये आयोजित दोन दिवसीय शिबिरामध्ये राज्यातील मानवाधिकार उल्लंघनाच्या २०० हून अधिक प्रलंबित प्रकरणांची सुनावणी झाली. सात प्रकरणांमध्ये आयोगाने नुकसान भरपाई देण्याची शिफारस केली. त्यापैकी राज्य सरकारने सहा प्रकरणांमध्ये ३२.५लाख रुपये दिल्याची माहिती आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे आणि राजीव जैन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यातील प्रलंबित खटल्यांच्या सुनावणीबरोबरच, राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांना मानवी हक्कांबद्दल जागरूक करणे आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी आणि मानवी हक्क रक्षकांशी संवाद साधणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. या प्रलंबित प्रकरणी राज्य शासनाचे संबंधित अधिकारी आणि तक्रारदारांना थेट विचारविनिमय करण्यासाठी सुनावणीला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. असेही श्री. मुळे यांनी सांगितले.
शिबिराच्या बैठकीदरम्यान, आयोगाने मानवाधिकार उल्लंघनाच्या २०० हून अधिक प्रकरणांची सुनावणी केली. यामध्ये वीज विभागाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू, सेवानिवृत्तीचे लाभ नाकारणे, ‘कोळी’ समाजबांधवांच्या मूलभूत हक्कांचे संरक्षण करण्यात कथित निष्काळजीपणा, इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू, बालकामगारांचा समावेश असलेल्या बंधनकारक मजुरीच्या घटना आणि न्यायालयीन/पोलीस कोठडीत मृत्यू अशा गंभीर उल्लंघनाच्या प्रकरणांच्या समावेश आहे. आयोगाने शिपिंग महासंचालक आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याशी संबंधित तीन बाबी देखील विचारात घेतल्याचे श्री. मुळे यांनी यावेळी सांगितले.
प्रलंबित सात प्रकरणांमध्ये आयोगाने नुकसान भरपाई देण्याची शिफारस केली होती. त्यापैकी राज्य सरकारने सहा प्रकरणांमध्ये ३२.५लाख रुपये संबंधितांना दिले आहेत. राज्य सरकारने आयोगाच्या आदेशानुसार उर्वरित एका प्रकरणात भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे.
मानवी हक्क उल्लंघनाची प्रकरणे उजेडात आणण्यासाठी माध्यमांनी सातत्याने दिलेल्या पाठिंब्यासाठी आणि मदतीसाठी प्रसारमाध्यमांचे आभार मानून प्रसारमाध्यमांच्या अहवालांच्या आधारे आयोगाला अनेक तक्रारी स्वतःहून दाखल करता आल्याचेही श्री. मुळे यांनी यावेळी सांगितले.
या दोन दिवसात आयोगाने महाराष्ट्र सरकारला काही महत्त्वाच्या शिफारशीही केल्या. मानवाधिकाराशी संबंधित प्रकरणे जलदगतीने निकाली काढण्याविषयीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याशिवाय आयोगाने विजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या प्रकरणांमध्ये पीडितांच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्यासाठी एकसमान धोरण तयार करण्याची शिफारसही केली आहे, असे सदस्य राजीव जैन यांनी सांगितले.
सुनावणी दरम्यान राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने कारागृह सुधारणा, सुधारित निवारागृह, बंधपत्रित मजुरांना अंतरिम नुकसान भरपाई तसेच पुनर्वसन आणि अंतिम नुकसान भरपाईसाठी इतर तरतुदी वेगाने आणि संवेदनशीलतेने हाती घेण्यावर भर दिला. वीजेच्या धक्क्याने मृत्यू होऊ नये यासाठी अवलंबल्या जाणाऱ्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत जनजागृती मोहीम राबविण्याचा सल्ला सदस्यांनी मुख्य विद्युत निरीक्षक कार्यालयाला दिला आहे.
प्रकरणे निकाली काढल्यानंतर, आयोगाने स्वयंसेवी संस्था/मानव संसाधन विकास संस्थांशी संवाद साधला. तक्रार दाखल करण्यासाठी आयोगाच्या hrcnet.nic.in या संकेतस्थळाचा उपयोग करण्याची माहिती या प्रतिनिधींना देण्यात आली.
आयोगाने महाराष्ट्र राज्यातील स्वयंसेवी संस्था आणि मानवाधिकार रक्षकांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले. तसेच भय न बाळगता किंवा पक्षपात न करता त्यांचे कर्तव्य प्रामाणिकपणे बजावण्यासाठी प्रोत्साहन दिले. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग तसेच स्वयंसेवी संस्था आणि मानव संसाधन विकास संस्थांची सातत्याने होणारी भागीदारी देशातील मानवाधिकार व्यवस्था बळकट करण्याच्या दिशेने बरीच प्रगती करेल असे सांगितले.
मानवी हक्कांच्या संरक्षणाबाबत आयोग जागरूकता कशी निर्माण करतो याविषयीची भूमिका आयोगाच्या सदस्य अनिता सिन्हा यांनी प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केली. कायद्याचे इंटर्न आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, पंचायती राज संस्था, राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आणि नेहरू युवा केंद्र स्वयंसेवकांसाठी आयोग प्रशिक्षण कार्यक्रम घेतो. याशिवाय लघुपट स्पर्धा, परिषदा, कार्यशाळा यासारखे उपक्रम मानवी हक्कांबाबत जागरूकता वाढविण्यास मदत करतात असेही त्यांनी स्पष्ट केले.
Related Posts
-
‘महिला आयोग आपल्या दारी’ अंतर्गतच्या जनसुनावणीत १७४ तक्रारींवर सुनावणी
नेशन न्यूज मराठी टीम. ठाणे/प्रतिनिधी – महिलांच्या तक्रारींवर तातडीने न्याय देण्यासाठी…
-
दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार विजेत्यांनी दिली भेट
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी -2022 च्या राष्ट्रीय क्रीडा…
-
प्रसादातून २०० भाविकांना विषबाधा
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. बुलढाणा/प्रतिनिधी - बुलढाणा लोणार तालुक्यातील…
-
राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त रॅलीच्या माध्यमातून जनजागृती
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पंढरपूर/प्रतिनिधी - डेंग्यू हा डासांमुळे…
-
१३ ऑगस्टला ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालत
नेशन यूज मराठी टिम. ठाणे - ठाणे येथील जिल्हा सेवा…
-
राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली/प्रतिनिधी - वर्ष 2021 साठीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मंगळवारी …
-
राष्ट्रीय महामार्गावरच्या टोल प्लाझासाठी मासिक पास
नेशन न्युज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली- राष्ट्रीय महामार्गा वापरकर्ता शुल्क…
-
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी ऑनलाईन नावनोंदणी करण्याचे आवाहन
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई- दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना प्रातिनिधिक स्वरूपात…
-
राष्ट्रीय औष्णिक उर्जा आयोगाकडून जैवविविधता धोरण जाहीर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - राष्ट्रीय औष्णिक उर्जा…
-
राष्ट्रीय योगा स्पर्धेसाठी तीन खेळाडूची निवड
नेशन न्यूज मराठी टीम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - पुणे येथे नुकत्याच झालेल्या…
-
'राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार' गौरव सोहळा संपन्न
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली / प्रतिनिधी - विद्यार्थ्यांमध्ये…
-
भारतीय रेल्वेला नऊ राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी देल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु…
-
पहिल्या राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेस मुदतवाढ
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - भारत निवडणूक आयोगाने पहिल्यांदाच…
-
दिव्यांग सक्षमीकरणात राज्याला सात राष्ट्रीय पुरस्कार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - दिव्यांग सक्षमीकरणात महाराष्ट्र राज्याने…
-
तृतीयपंथीय व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्रासाठी राष्ट्रीय पोर्टल सुरु
मुंबई/प्रतिनिधी - सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली यांचेकडून तृतीयपंथीय…
-
नांदेड किनवट राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टिम. नांदेड/प्रतिनिधी- मार्च 2023 मध्ये वादळी…
-
कल्याणच्या ऋतुजाने राष्ट्रीय रोलर स्केटींग स्पर्धेत पटकविले कांस्यपदक
कल्याण प्रतिनिधी - रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने मोहाली…
-
राष्ट्रीय लॉजिस्टिक पोर्टल- मरीनचे उद्घाटन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि…
-
राष्ट्रीय आपत्तीनिधीतून महाराष्ट्राला ३५५ कोटींचा निधी मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - महाराष्ट्रात आलेल्या पूर…
-
कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्याला राष्ट्रीय पुरस्कार
प्रतिनिधी. मुंबई - स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र सरकारच्या पेयजल…
-
महाराष्ट्रातल्या दोन शोर्यवीर बालकांना राष्ट्रीय वीरता पुरस्कार
नेशन न्युज मराठी टीम महाराष्ट्राच्या दोन बालकांना राष्ट्रीय वीरता पुरस्काराने…
-
मागासवर्गीय आयोग पुनर्गठीत करायला पाहीजे - संभाजीराजे
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई / प्रतिनिधी - इंडिया अलायन्सची…
-
मंत्रालयात स्वतंत्र सफाई कर्मचारी आयोग कक्ष स्थापन
मुंबई/प्रतिनिधी - राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत ‘सफाई कर्मचारी आयोग…
-
अमरावतीत कृषी कायद्या विरोधात राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन
प्रतिनिधी. अमरावती - सातबारा वाचवण्यासाठी आठ बाराचा बंद यशस्वी करा…
-
सरदार पटेल राष्ट्रीय एकता पुरस्कारासाठी नामांकने पाठविण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - देशाची एकता व अखंडता राखण्यासाठी निस्वार्थ भावनेने अथक…
-
ठाणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
मुंबई/प्रतिनिधी - ठाणे महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू…
-
राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याची २६ जून अंतिम मुदत
प्रतिनिधी . सांगली - केंद्र शासनामार्फत सन 2017-18 व सन…
-
महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
नवी दिल्ली/प्रतिनिधी - महाराष्ट्रातील दोन शिक्षकांना अध्यापन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२१…
-
राष्ट्रीय माध्यम पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन
प्रतिनिधी. मुंबई- मतदार शिक्षण व मतदान जनजागृती विषयात सन 2020…
-
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन
नेशन न्यूज़ मराठी ऑनलाइन टिम. नागपूर/प्रतिनिधी - कृत्रिम बुध्दिमत्ता व इतर…
-
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात महात्मा गांधींच्या दुर्मिळ चित्रफितीचे प्रक्षेपण
नेशन न्यूज मराठी टीम. पुणे/प्रतिनिधी -पुणे येथील राष्ट्रीय चित्रपट विकास…
-
राष्ट्रीय पोलीस अश्वारोहण स्पर्धेत हर्ष पोद्दार यांना सुवर्णपदक
नेशन न्यूज मराठी टीम. अमरावती - अखिल भारतीय पोलीस अश्वारोहण स्पर्धेत…
-
'राष्ट्रीय युवा संसद' स्पर्धेसाठी श्रद्धा शिरोडकरची निवड
नेशन न्युज मराठी टिम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - राष्ट्रीय युवा संसद…
-
गुजरातमधील सिंह नोव्हेंबरअखेरीस संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येणार
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - गुजरातमधील सक्करबाग येथील सिंहाची…
-
पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी नामांकनसाठी ३१ ऑक्टोबर पर्यंत मुदत
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - केंद्रीय महिला आणि…
-
टपाल खात्याकडून राष्ट्रीय पातळीवरील पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. पणजी- टपाल खात्याकडून चालू आर्थिक वर्षासाठी…
-
राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलचा प्रारंभ, विविध पुरस्कारांसाठी नामांकन खुले
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली/प्रतिनिधी - पारदर्शकता आणि जन…
-
६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई - वर्ष 2020 साठीच्या 68…
-
केडीएमसी कर्मचा-यांना ७ वा वेतन आयोग लागू
प्रतिनिधी. कल्याण - राज्य शासनाने 1 जानेवारी 2016 पासून 7…
-
राष्ट्रीय कराटे स्पर्धत कल्याणच्या खेळाडूंची २१ पदकांची कमाई
नेशन न्युज मराठी टिम. कल्याण/संघर्ष गांगुर्डे - गुजरात येथे वर्ल्ड गोजू…
-
पोलाद मंत्रालय आता गतीशक्ती राष्ट्रीय पोर्टलवर दाखल
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली - भास्कराचार्य नॅशनल इन्स्टिट्यूट…
-
कुनो राष्ट्रीय उद्यानातल्या चित्त्यांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष- राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण
नेशन न्यूज मराठी टीम. नवी दिल्ली/प्रतिनिधी - दक्षिण आफ्रिका आणि…
-
ओबीसींचे आरक्षण कायम ठेवावे मागणीसाठी,राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
नेशन न्यूज मराठी टीम. बीड / प्रतिनिधी - ओबीसींच्या हक्काचे…
-
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी २० जून२०२१ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई/प्रतिनिधी - राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी यावर्षी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात…
-
राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणांतर्गत महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर
नेशन न्यूज मराठी टीम. मुंबई/प्रतिनिधी - राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणांतर्गत महाराष्ट्राला…
-
राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल सुरू, विविध पुरस्कारांसाठी नामांकन खुले
नेशन न्यूज मराठी नेटवर्क. नवी दिल्ली - भारत सरकारच्या विविध…
-
विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे पुण्यात आयोजन
नेशन न्यूज मराठी ऑनलाइन टीम. पुणे/प्रतिनिधी - पुण्यातील बालेवाडी येथील…