Desk Marathi News

महत्वाच्या बातम्या

बनावट कागदपत्रांच्या आधारे चोरीच्या वाहनांची विक्री,९ जन गजाआड दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत दहा वर्षात या कोकणात एकही राजकीय हत्या होऊ दिली नाही-विनायक राऊत
करियर चर्चेची बातमी

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल अकादमी परीक्षा(II), २०२२-अंतिम निकाल जाहीर

नेशन न्यूज मराठी टीम.

नवी दिल्ली/प्रतिनिधी – राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी आणि नौदल अकादमी परीक्षा(II), 2022- अंतिम निकाल जाहीर करण्यात आले आहेत.

या परिक्षा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या शाखांमध्ये 150 व्या अभ्यासक्रमासाठी आणि 112 व्या भारतीय नौदल अकादमी अभ्यासक्रमासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने 04 सप्टेंबर 2022 रोजी  लेखी स्वरूपात घेतल्या होत्या. या परीक्षेच्या निकालाच्या आधारे आणि त्यानंतर संरक्षण मंत्रालयाच्या सेवा निवड मंडळाने घेतलेल्या मुलाखतींच्या आधारे पात्र ठरलेल्या 538 उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार खालील निवड यादी आहे. वरील अभ्यासक्रम सुरू होण्याच्या तारखेसंबंधी तपशीलवार माहितीसाठी, कृपया संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइट्सला भेट द्या, म्हणजेच www.joinindianarmy.nic.in www.joinindiannavy.gov.in आणि www.careerindianairforce.cdac.in. येथे भेट द्या.या याद्या तयार करताना वैद्यकीय चाचणीचे निकाल विचारात घेतलेले नाहीत.

या उमेदवारांची उमेदवारी ही तात्पुरती असून त्यांची जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादींबाबत त्यांनी केलेल्या दाव्याची पुष्टी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे थेट अतिरिक्त नियुक्ती महासंचालक, ऍडजुटन्ट जनरल शाखा, एकात्मिक मुख्यालय, संरक्षण मंत्रालय(लष्कर), वेस्ट ब्लॉक क्र. III, आर. के. पुरम, नवी दिल्ली-110066 या ठिकाणी पाठवण्यावर अवलंबून आहे. यूपीएससीकडे नव्हे. 

जर उमेदवाराच्या पत्त्यामध्ये कोणताही बदल झाला असेल तर खाली दिलेल्या पत्त्यावर लष्कर मुख्यालयाशी थेट संपर्क साधून त्याची माहिती तातडीने देण्यात यावी अशी सूचना उमेदवारांना करण्यात येत आहे.

हे निकाल यूपीएससीची वेबसाईट  https:// www.upsc.gov.in येथे उपलब्ध आहेत. मात्र, उमेदवारांचे गुण अंतिम निकाल जाहीर झाल्यापासून 15 दिवसानंतर वेबसाईटवर उपलब्ध होतील.

अधिक जास्त माहितीसाठी उमेदवार आयोगाच्या ‘C’ प्रवेशद्वारावर सुविधा केंद्राशी व्यक्तिगत किंवा 011-23385271/011-23381125/011-23098543 या क्रमांकांवर कोणत्याही कार्यालयीन कामाच्या दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत संपर्क साधू शकतात. त्याशिवाय एसएसबी/ मुलाखतविषयक प्रकरणासाठी लष्कर ही पहिली पसंती असल्यास उमेदवार 011-26175473 या क्रमांकावर किंवा joinindianarmy.nic.in येथे आणि नौदल/ नौदल अकादमी ही प्रथम पंसती असल्यास   011-23010097/Email:officer-navy[at]nic[dot]in किंवा joinindiannavy.gov.in येथे आणि हवाई दल ही प्रथम पसंती असल्यास  011-23010231 Extn. 7645/7646/7610 किंवा www.careerindianairforce.cdac.in येथे संपर्क साधू शक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
X