नेशन न्यूज मराठी टिम.
नाशिक/प्रतिनिधी – मागच्या काही महिन्यांपासून सायबर क्राईम अर्थात ऑनलाइन फसवणुकीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. नाशिक मध्ये देखील अगदी हजार रुपये पासून ते लाखो रुपये पर्यंत ऑनलाईन फसवणुकीच्या घटना आत्तापर्यंत शहरात उघडकीस आल्या आहेत.
याच घटना रोखण्यासाठी आता नाशिक पोलीस सायबर दुत ही योजना राबवणार आहेत. या कार्यक्रमाच्या अंतर्गत नाशिक पोलीस शहरातील वेगवेगळ्या महाविद्यालयातील काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना प्रशिक्षण देणार आहेत. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून ऑनलाईन फसवणूक कशा पद्धतीने टाळता येईल याबाबत पूर्ण प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण झाल्यानंतर हेच विद्यार्थी पुढे सायबर दूत म्हणून आपल्या विद्यालयातील विद्यार्थी, पालक आणि इतर मित्र वर्गाला सायबर क्राईमचा धोक्यापासून कसे वाचता येईल यासंदर्भात जनजागृती करणार आहेत.या सायबर दुत कार्यक्रमच्या माध्यमातून अशा घटना थांबवता येतील असा विश्वास नाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी व्यक्त केला आहे.